गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घराघरातील पुरूषांची आणि गृहिणींची लगबग सुरू झाली आहे. फराळ काय करायचा, यंदाचं डेकोरेशन कसं असेल, साफ-सफाई बाकीये.... असे अनेक विचार तुम्हीसुद्धा करत असाल. लॉकडाऊनमुळे साध्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला तरी उत्साह मात्र तेव्हढाच असेल. गणपती बाप्पाला सजवण्यासाठी काय वेगळं करता येईल याचा तुम्ही विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला मखर तयार करण्याची भन्नाट आयडिया सांगणार आहोत.
लॉकडाऊनमुळे दरवर्षीप्रमाणे खर्च करणं सगळ्यांनाच शक्य नसेल. कमी खर्चाच तुम्ही बाप्पासाठी सुंदर मखराची निर्मीती करू शकता. हे मखर कमीतकमी वेळेत तयार होणारे असून खूप आकर्षक दिसतात. फारचं साहित्य यासाठी लागत नाही. मोजक्या काही वस्तूंचा साहित्यात समावेश करून तुम्ही अप्रतिम कलाकृती तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊन कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात कसे तयार करायचे मखर.
इको फ्रेण्डली डेकोरेशन
झटपट मखर
कागदी कपांपासून मखर
सोपे मखर डेकोरेशन
बाटल्यांचे डेकोरेशन
हे पण वाचा-
लढ्याला यश! आता कोरोनाला शरीरात जाण्यापासून रोखणार एंटीबॉडी इनहेलर, तज्ज्ञांचा दावा
यशस्वी लसीच्या दाव्यावरून WHO नं केली रशियाची पोलखोल; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा