पुणे : एखादा घरगुती समारंभ, रिस्पेशन, लग्नसराई अथवा सण-उत्सव असोत... आनंदाचे क्षण शेअर करण्याचे हक्काचे व्यासपीठ कुठले तर, व्हॉटस अॅप, फेसबुक आणि ्ट्विटर असा एक टे्रंड रूजला आहे. टेक्नोसॅव्ही असलेल्या तरूणाईला सं़पर्कासह संवादासाठी ही सोशल माध्यम आता अधिकच जवळची वाटू लागली आहेत, म्हणूनच गणेशोत्सवाच्या एक दिवस अगोदरच तरूणाईच्या व्हॉटस अँपचे स्टेटस, डीपी बदलले असून, अगदी पहिल्या दिवशी गणेशोत्सवाचे आगमन कसे झाले, घरातील सजावट, गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात वाजत गाजत गणरायाचे केलेले स्वागत, याची छायाचित्रे सोशल मिडियावर अपलोड करण्यात आली आहेत. गणेशोत्सवाचे मेसेज, आरत्या, संस्कृत श्लोक यामाध्यमातून गणेशाची आराधना केली जात आहे. गणेशोत्सवाची ही क्रेझ आॅनलाईनसह स्मार्ट फोनवरही पुढील आठवडाभर राहणार आहे.घराघरांमध्ये जशी गणरायाच्या स्वागताची तयारी केली जाते, तशीच गणेशोत्सवाच्या काळात व्हॉटसअपचे स्ट्टेस, डीपी कुठले ठेवायचे, सोशल मिडियावर कधी, कोणत्या दिवशी वेगवेगळी छायाचित्रे अपलोड करायची याचे जोरदार प्लँनिंग तरूण मंडळींकडून केले जाते, त्यानुसार अगदी ठरल्या प्रमाणे टेक्नॉसँव्ही तरूणाईने गणेशोत्सवाच्या आगमनापासूनच फेसबुकवर विविध छायाचित्रे अपलोड केल्याचे दिसून आले. दोन दिवसामध्ये गौरींचेही घरात आगमन होणार असल्याने तरूणींनीही छानपैकी प्लँनिंग सुरू झाले आहे. घराबरोबरच सोशल मिडियावरही अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा अनोखा फंडा तरूणाईने निवडला आहे. दिवसभरात व्हॉटस अँपचा इनबॉक्सही मेसेजेस आणि छायाचित्रांनी फुल्ल होऊ लागला आहे. मानाच्या गणपतीपासून ते प्रतिष्ठेचे समजल्या जाणा-या दगडूशेठ हलवाई गणपती आणि अखिल मंडई मंडळ या गणपतींचे दर्शनही दूर असलेल्या आप्तेष्टांना फेसबुक, व्हॉटस अँपच्या माध्यमातून घडविले जात आहे.
सोशल मीडियावर गणेशोत्सवाची धूम
By admin | Published: September 07, 2016 1:06 AM