शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

गणेशोत्सव मंडळांना मिळणार पाच रुपये नऊ पैसे दराने वीज

By appasaheb.patil | Published: August 20, 2019 7:06 PM

महावितरणकडून दिलासा : सार्वजनिक उत्सवासाठी स्वस्तात वीज देण्याचा निर्णय

ठळक मुद्देगणेशोत्सव काळात मंडळांना २४ तासांच्या आत वीजजोडणी देण्याची तयारी महावितरणकडून करण्यात आलीउत्सवासाठी घेतलेल्या वीजजोडणीद्वारे वीज वापरासाठी केवळ एकच वीजदर आकारण्यात येत आहेकितीही वीज वापरल्यास शेवटच्या युनिटपर्यंत केवळ पाच रुपये नऊ पैसे दर आकारण्यात येणार

सोलापूर : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आता महावितरणकडून वहन आकारासह पाच रुपये नऊ पैसे प्रतियुनिट या दराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी मिळणार आहे. गणेशोत्सव काळात मंडळांना २४ तासांच्या आत वीजजोडणी देण्याची तयारी महावितरणकडून करण्यात आली असून, संबंधित मंडळांनी अधिकृत वीजजोडणी करून वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केले.

सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवाच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट तीन रुपये एकोणऐंशी पैसे अधिक एक रुपया तीस पैसे वहन आकार असे वीजदर आहेत. याउलट घरगुती व वाणिज्यिक किंवा इतर वर्गवारीमध्ये वीज वापराच्या स्लॅबनुसार वेगवेगळे वीजदर निश्चित करण्यात आले आहेत. उत्सवासाठी घेतलेल्या वीजजोडणीद्वारे वीज वापरासाठी केवळ एकच वीजदर आकारण्यात येत आहे. त्यामुळे कितीही वीज वापरल्यास शेवटच्या युनिटपर्यंत केवळ पाच रुपये नऊ पैसे दर आकारण्यात येणार आहे. 

या तुलनेत घरगुती व वाणिज्यिक वर्गवारीचा वीजदर स्लॅबनुसार दुप्पट व तिपटीने अधिक आहे. गणेश मंडळांना तात्पुरती वीजजोडणी देण्यासाठी पुरेसे वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उपलब्ध असलेले मीटर हे प्राधान्याने गणेश मंडळांच्या वीजजोडणीसाठी वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता आहे. पावसामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी वीज यंत्रणेची योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सुरक्षेसाठी तडजोड नको...- विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीज सुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणGanesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सव