लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळे गुरव : निकृष्ट दर्जाचे काम, कधी सिलिंडर नसणे, वीज बंद, वीज बिल न भरणे, मशिन बंद, कामगारांचे थकीत वेतन आदी कारणांमुळे जुनी सांगवीतील गॅस शवदाहिनी एक महिन्यापासून विविध समस्यांमुळे बंद आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय होत असून, मृताच्या नातेवाइकांना वणवण करण्याची वेळ येत आहे. अनेक वेळा गॅस सिलिंडर नसल्यामुळे, वारंवार वीजपुरवठा बंद असणे, अधूनमधून मशिन बंद असणे, तीन- तीन-तीन, चार-चार महिने कामगारांचे वेळेत वेतन न होणे आदी कारणांमुळे शवदाहिनी ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती नागरिकांची झाली आहे. या सर्व गोष्टींमध्ये ठेकेदार नामानिराळा असून, नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. महानगरपालिका फक्त टोलवाटोलवीची उत्तरे देत आहे. ठेकेदाराला देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असतानादेखील काम होत नाही. मनपा कारवाई करायला धजावत नाही. नागरिकांनी कोणाकडे जायचे हा मोठा प्रश्नच आहे. तांत्रिक बिघाडामुळे शवदाहिनी बंद असल्याचा फलक शवदाहिनीसमोर लावला आहे. तरी महापालिने लक्ष घालून पुढील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शवदाहिनी गेल्या २२ दिवसांपासून बंद असल्याने फोनवरून तक्रार करूनदेखील कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. भूमिगत पाण्याची टाकी गळती झाल्याने टाकीत पाणीच नाही. टाकी गरम होऊन फुटू शकते. त्यामुळे अंत्यविधीकरिता मृतदेह घेऊ शकत नाही. मनपा आयुक्त, तसेच मनपा पर्यावरण विभागाला निवेदनाद्वारे तक्रार केली. २२ दिवसात १० ते १२ शव (मृतदेह) पुणे मनपाकडे अंत्यविधीकरिता पाठविण्याची वेळ आली. पिं.चिं.मनपा फक्त टोलवाटोलवीची उत्तरे देत आहे. ठेकेदाराला देखभाल-दुरूस्तीची जबाबदारी असतानादेखील काम होत नाही. मनपाकडे वारंवार तक्रार करुनदेखील कारवाई करायला धजावत नाही. निकृष्ट दर्जाचे काम असल्याने महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कधी येऊन कामाच्या दर्जाची तपासणी केली आहे की नाही, याबाबत संशय आहे. नागरिकांनी कोणाकडे जायचे हा मोठा प्रश्नच आहे. तरी आयुक्तांनी याबाबत विचार करून पुढील कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.>नाईलाजास्तव लाकडांचा वापर या बाबत मनसेचे शहर सचिव राजु सावळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लेखी निवेदन दिले आहे. सावळे म्हटले आहे की, शवदाहिनीला दोन वर्ष पुर्ण झाली. मात्र काम निकृष्ट दजार्चे झाले आहे. दोन दिवसात शवदाहिनी सुरु नाही झाली तर मनसे स्टाईलच्या वतीने आंदोलन करणार असल्याचे श्याम जगताप व शाखा अध्यक्ष महेश केदारी यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे.पर्यावरण संरक्षण कार्यक्रमांतर्गत लाकडांचा कमीतकमी वापर करण्याचे आवाहन शासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. त्यासाठी गॅस शवदाहिनीचा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे. मात्र, स्मार्ट सिटी ओळख बनवू पाहणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात विविध कारणास्तव शवदाहिनी बंद अवस्थेत रहात असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षपणामुळे लाकडांचाच वापर करावा लागत आहे.
सांगवीतील गॅस शवदाहिनी महिन्यापासून बंद
By admin | Published: June 07, 2017 1:50 AM