शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सामूहिक बलात्कार, हत्येप्रकरणी दोघांना फाशी

By admin | Published: May 12, 2017 3:44 AM

कचरावेचक दोन तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करून एकीची हत्या करणाऱ्या दोघा नराधमांना ठाणे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कचरावेचक दोन तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करून एकीची हत्या करणाऱ्या दोघा नराधमांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी फाशीची शिक्षा ठोठावली. रहिमुद्दीन महफू ज शेख उर्फ बाबू उर्फ बाबा (२४) आणि संदीप समाधान शिरसाठ उर्फ रघू रोकडा (२०) अशी फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.या प्रकरणाची सुनावणी ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.सी. खलिपे यांच्यासमोर झाली. रक्ताचे डाग असलेले कपडे, हत्येसाठी वापरलेली हत्यारे, फिर्यादी आणि ११ साक्षीदारांची साक्ष ग्राह्यमानून या दोघांना दोषी ठरवण्यात आले. दोघांनाही ३०२ कलमान्वये फाशीची शिक्षा आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड, ३७६ कलमान्वये जन्मठेप आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड तसेच ३२६ कलमान्वये १० वर्षे शिक्षा आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच दंडातील १५ हजार रुपये मृत तरुणीच्या वारसांना, तर उर्वरित १५ हजार रुपये पीडित फिर्यादीला देण्यास न्यायालयाने सांगितले आहे. २०१२ मध्ये नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. ९ मे २०१२ रोजी घाटकोपर येथील विद्या बनसोडे (२८) ही नवी मुंबई येथे राहणाऱ्या मैत्रिणीकडे आली होती. दोघीही कचरावेचक असल्याने त्या दिवशी दोघी वाशी रेल्वे स्टेशनजवळ बसथांब्यावर ये-जा करणाऱ्या लोकांकडे पैसे मागत असताना, दोघींना आरोपींनी नोकरी देतो, असे सांगून रिक्षात बसवून मुंबई-पुणे हायवेने जुईनगर ब्रिजजवळ नेले. तेथे रिक्षा सोडून सीबीडी येथील बोगद्यात त्यांना ते घेऊन गेले. तेथे दोघांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच त्यांनी त्या दोघींवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. याचदरम्यान, विद्याची मैत्रीण तेथून पळून जात असताना काही अंतरावर जाऊन बेशुद्ध होऊन पडली, तर विद्याचा जागीच मृत्यू झाला. दोघींचाही मृत्यू झाल्याचे समजून हे दोघे आरोपी पळून गेले.विद्या हिच्या शरीरावर ८ ते १० आणि तिच्या मैत्रिणीवर ११ ते १२ वार करण्यात आले होते. याचदरम्यान, तेथून जाणाऱ्या एका रिक्षाचालकाने विद्याच्या मैत्रिणीला रुग्णालयात नेले. ती शुद्धीवर आल्यानंतर १० मे रोजी या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तपासादरम्यान पीडित आणि आरोपी अशा चौघांना तेथील एका सुरक्षारक्षकाने एकत्र पाहिले असल्याचे पोलिसांना सांगितले होेते. तसेच त्यातील बाबू नावाच्या व्यक्तीला ओळखत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार, १४ मे २०१२ रोजी नवी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून रक्ताचे डाग असलेले कपडे, हत्यारे जप्त केली.