शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

फोन कॉलवर गांजा : माफियांची नवीन शक्कल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 6:36 AM

पोलिसांच्या धाडसत्रामुळे शहरातील प्रमुख गांजा अड्डे बंद झाले असले तरी विक्री पूर्णपणे थांबलेली नाही. नियमित ग्राहकांनी फोनवर मागणी केली की काही क्षणात गांजा पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई : पोलिसांच्या धाडसत्रामुळे शहरातील प्रमुख गांजा अड्डे बंद झाले असले तरी विक्री पूर्णपणे थांबलेली नाही. नियमित ग्राहकांनी फोनवर मागणी केली की काही क्षणात गांजा पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. शहरातील तरुणाईला व्यसनांच्या जाळ्यात अडकविणाºया या माफियांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जाऊ लागली आहे.सारसोळे सेक्टर ६ मधील जय दुर्गामाता भाजी मंडईमध्ये दोन दिवसांपूर्वी ७ ते ८ तरूण गांजा ओढत बसले होते. महापालिकेचे हे मार्केट मद्यपी व गांजा ओढणाºयांसाठीच बांधले असल्याची भावना नागरिकांमध्ये होवू लागली आहे. गांजा ओढत असतानाच या तरूणांनी शहरात पोलिसांनी सुरू केलेल्या धाडसत्राविषयी चर्चा सुरू केली. सेक्शन गरम आहे. पोलिसांनी नेरूळमधूनच ३९ किलो गांजा जप्त केला आहे. एपीएमसीमध्येही महिलेला अटक केली आहे. अनेक ठिकाणचे गांजा अड्डे बंद झाले आहेत. पण आपल्याला टेंशन नाही. आपण एक फोन केला की तत्काळ गांजा मिळतो. पोलिसांच्या कारवाईमुळे गांजाचे दर वाढले असल्याचीही चर्चा या तरूणांमध्ये सुरू झाली होती. याविषयी ‘लोकमत’ने माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता शहरामध्ये फोनवरून गांजाची आॅर्डर घेण्याचा नवीन ट्रेंड विकसित झाला असल्याचे समजले. एपीएमसीमध्ये गांजा विकणारा पप्या, तुंडा हे आता एमआयडीसी परिसरामध्ये वास्तव्य करत आहेत. नियमित ग्राहकांनी फोन केला की त्यांना निर्मनुष्य ठिकाणी बोलावून गांजा दिला जात आहे. तुर्भे रेल्वे स्टेशनसमोरील एका किराणा दुकानामध्ये व हनुमान नगरमध्ये लालीचा अड्डाही अद्याप सुरूच असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.नेरूळ व सीवूडमध्ये सहजपणे गांजा उपलब्ध होवू लागला आहे. बालाजी टेकडी परिसरामध्ये एक महिला व काही मुले गांजा विकत आहेत. मोटारसायकलवरून आलेले तरूण या परिसरामध्ये फिरून व्यवसाय करणाºयांकडून गांजा विकत घेत आहेत. बालाजी टेकडीवरील चर्चकडच्या पायरी मार्गाने खाली उतरले की शेवटच्या झोपडीमध्ये गांजा विक्री केला जात आहे.नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही तेथील अड्डा बंद झालेला नाही. खुलेआम सुरू असलेल्या अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी रहिवासी करत आहेत. गांजा विक्री करणारे कारवाईच्या भीतीमुळे स्वत:जवळ जास्त साठा ठेवत नाहीत.छोट्या पुड्या वेगवेगळ्या ठिकाणी साठवून ठेवल्या जात असून मागणीप्रमाणे त्या विकल्या जात असल्याचे निदर्शनास येत असून हे सर्व व्यवसाय बंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.कारवाईची मागणीशहरामध्ये यापूर्वी एपीएमसी परिसरामध्ये गांजा विक्री करणारा पप्या व तुंडा एमआयडीसीत फोनवरून आॅर्डर घेवून गांजा विक्री करत आहे. तुर्भे स्टेशनसमोर एक अड्डा अद्याप सुरू असून हनुमान नगरमध्ये बंद झालेला अड्डा पुन्हा सुरू झाला आहे. नेरूळ एल. पी. पुलाजवळील शिवाजीनगर झोपडपट्टीमध्ये दोन ठिकाणी गांजा विकला जात आहे. नेरूळमधील बालाजी टेकडी परिसरातील झोपडीमध्ये एक महिला व टेकडी परिसरामध्ये काही मुले फोनवर आॅर्डर घेवून गांजा विकत असल्याची माहिती काही गांजा विकणाºया तरूणांनीच दिली.पोलिसांसमोर आव्हानगांजा व इतर अमली पदार्थांचे प्रमुख अड्डे उद्ध्वस्त झाले असले तरी प्रत्यक्षात मात्र अद्याप गांजा विक्री बंद झालेली नाही. नेरूळ सेक्टर ६ मधील जय दुर्गामाता भाजी मंडई, कोपरखैरणेत दोन ठिकाणी व इतर परिसरामध्येही तरूण खुलेआम गांजा ओढत असतात. त्यांच्यावर कारवाई करावी व गांजा पुरविणाºयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.