शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचा राजीनामा घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:06 AM

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधारात ठेवले, अतिरिक्त मुख्य सचिवांनी फाइलवर लेखी नकार दिल्यानंतरही, त्यांनी ही फाइल मंजूर केली.

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधारात ठेवले, अतिरिक्त मुख्य सचिवांनी फाइलवर लेखी नकार दिल्यानंतरही, त्यांनी ही फाइल मंजूर केली. त्यामुळे एसडी कार्पोरेशन या बिल्डर कंपनीला ५०० ते ७०० कोटींचा फायदा होत होता. हे सगळे प्रकरण माध्यमांनी उघडकीस आणल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी त्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मात्र, केवळ स्थगिती देऊन चालणार नाही, त्यासाठी सखोल चौकशी व्हायला हवी, ती होईपर्यंत मेहता यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारचे वाभाडे काढले.ताडदेव येथील एमपी मिल कम्पाउंडमधील जागेवर एसआरएची योजना होती. त्यातील झोपडपट्टी धारकांना कोणतेही लाभ नको आहेत, असे बिल्डर कंपनीने सांगणे आणि त्यावर म्हाडाचे तत्कालीक प्रमुख विश्वास पाटील यांनी प्रस्ताव तयार करून मंत्रालयात पाठविणे, त्या प्रस्तावाला अतिरिक्त मुख्य सचिवांनी लिखित स्वरूपात नकार दिल्यानंतर, हे काम करणे योग्य व कोणत्याही नियमात बसत नाही, असे सांगितल्यानंतरही ही फाइल मंत्री प्रकाश मेहता यांनी मंजूर केली. त्या वेळी फाइलवर ‘मा. मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे’ असे नमूदही केले होते. मुख्यमंत्री मात्र आपल्याला कोणतीही माहिती नव्हती, असे सांगतात. त्यामुळे यात दोघांपैकी कोणीतरी एक जणच खरे बोलत आहे. ही बाब वरकरणी साधी नाही, तर यात मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे. या प्रकरणात सर्वाेच्च पातळीवरून निर्णय झाला आहे, असेही मेहता यांनी फाइलवर म्हटले आहे. अशा वेळी या निर्णयाला केवळ स्थगिती देण्यापुरता हा विषय मर्यादित नाही. याची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे. सगळ्यांनी या फाइलवर नकारघंटा लिहिली असतानाही ही फाइल का मंजूर झाली, हे चौकशीतून समोर आले पाहिजे. तोपर्यंत मंत्रिपदावर राहण्याचा मेहता यांना अधिकार नाही, अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी गृहविभागावर तोफ डागली.दुसºया एका प्रकरणात एका विकासकाने आरटीआय कार्यकर्त्याचे तोंड बंद करण्यासाठी ११ कोटींची लाच देऊ केली, त्या व्यक्तीने ४० लाख रुपये टीव्हीवर दाखवले. नोटबंदीनंतर काळा पैसा बंद झाला, असे अरुण जेटली म्हणाले होते. कॅशचे व्यवहार बंद होतील, असे पंतप्रधान म्हणाले होते. मग हा एवढा पैसा आला कोठून? एका तरी अधिकाºयाकडून त्याची चौकशी केली का? असे बोचरे सवालही चव्हाण यांनी उपस्थित केले.रेरा कायद्यासह अनेक विषयांवर चव्हाण यांनी सरकारच्या अनास्थेची चिरफाड केली. मुंबईला स्वच्छ भारत अभियानाच्या निकषानुसार १ लाख ६३ शौचालयांची गरज आहे. प्रत्यक्षात १ लाख सार्वजनिक शौचालये आहेत. बाकीचे कोण बांधणार आहे? आणि जर एवढी शौचालये नाहीत, तर मग मुंबईला प्रमाणपत्र देऊन कौतुक कसे केले, असे सवाल करून, त्यांनी सत्ताधारी बाकांवर अस्वस्थता निर्माण केली.