सोलापूर: सोलापुरातील गारमेंट उद्योगामध्ये राष्ट्रीय नव्हे, तर अंतरराष्ट्रीय पातळीवरील अव्वल दर्जाची गुणवत्ता असल्याचे गौरवोद्गार काढतानाच सोलापूरसह महाराष्ट्रातील गारमेंट उद्योगाचे परदेशात प्रदर्शन भरविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले़श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघ आणि राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने सोलापुरात आयोजित केलेल्या पहिल्या शालेय गणवेश व वस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी देशमुख यांच्या हस्ते झाले़ या वेळी ते बोलत होते़ तीन दिवस हे प्रदर्शन बालाजी सरोवरमध्ये आयोजित केले असून, यामध्ये देशभरातील उद्योजक सहभागी झाले आहेत़ सोलापूर शहरात तयार होणाऱ्या विविध गारमेंट तसेच युनिफॉर्मतयार करणाऱ्या व्यावसायिकांचे८२ स्टॉल्स या प्रदर्शनातभरविण्यात आले आहेत़ परदेशातील १३ पाहुणेदेखील सहभागी झाले आहेत़आंध्र, कर्नाटक यांच्या जवळ असलेले सोलापूर हे महाराष्ट्रातील एक शहर असून, इथे मोठ्या प्रमाणावर युनिफॉर्म तयार केले जातात़ कापडपुरवठा करणारी मफतलाल ही देशातील अग्रगण्य कंपनी असून, आमच्यासाठी सोलापूर हे खूप महत्त्वाचे शहर आहे, असे मफतलाल इंडस्ट्रीजचे हृषीकेश मफतलाल यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
गारमेंट उद्योगाचे प्रदर्शन परदेशात भरविणार
By admin | Published: January 06, 2017 4:04 AM