मुंबई : मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात घट नोंदविण्यात येत आहे. दुसरीकडे अरबी समुद्रावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले असतानाच, पुढील ४८ तासांसाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील वातावरण ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मागील तीन दिवसांपासून मुंबईच्या थंडीत वाढ झाली आहे. कमाल आणि किमान तापमान दोनएक अंशांनी खाली उतरले आहे. परिणामी, येथील थंडी दिवसेंदिवस वाढत असून, दिवसासह रात्री वाहणारे बोचरे वारे थंडीत आणखी भर घालत आहे. थंडीत वरचेवर वाढ होत असल्याने मुंबईकरांनीही ऊबदार वस्त्रे परिधान करण्यास सुरुवात केली असून, गुलाबी थंडीने मुंबईकर सुखावले आहेत. (प्रतिनिधी)राज्यात हवामान कोरडेराज्याचा विचार करता गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदविले आहे. कोकणाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या संपूर्ण भागात तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकणाच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.किमान तापमान अंश सेल्सिअसमध्येमालेगाव १५.२, अहमदनगर १५.६, नांदेड १६, पुणे १६.४, जळगाव १७.४, नाशिक १७.५, सातारा १८.२, महाबळेश्वर १८.३, अमरावती १८.४, मुंबई १८.४अंदाज : १५ ते १६ डिसेंंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. १७ ते १८ डिसेंबर : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील.
गारवा मुंबई मुक्कामी
By admin | Published: December 15, 2015 2:00 AM