ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 01 - पुण्यातील आबासाहेब गरवारे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान कार्यालय व कार्मिक मंत्रालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची बुधवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली.
आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये मास कम्युनिकेशन पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी जितेंद्र सिंह यांच्यासोबत नोटाबंदी, जम्मू-काश्मीर, जीएसटी, नार्थ ईस्ट यांसह अनेक विषयांवर त्यांनी चर्चा केली. सध्या हे विद्यार्थी दिल्ली अभ्यास दौ-यावर आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ आॅगस्ट २०१५ रोजी याची घोषणा केली होती व एक जानेवारी २०१६ पासून त्याची अंमलबजावणी केली गेली. अराजपत्रित पदांसाठीच्या मुलाखती रद्द करण्याचा मोदी यांचा महत्वाचा निर्णय देशात पहिल्यांदा महाराष्ट्राने राबवला. अशा राज्यातून आल्याबद्दल जितेंद्र सिंह यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याचबरोबर, गेल्याकाही दिवसांपूर्वी घेण्यात आलेला नोटाबंदीचा निर्णय सकारात्मक असून यामुळे जवळजवळ 60 टक्के दहशतवाद्यांच्या कारवाया बंद झाल्या आहेत, तर हवालामार्फत होणा-या व्यवहारांमध्ये 50 टक्के घट झाली आहे, असेही जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले.