शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

वनांशेजारील गावांमध्येही सवलतीच्या दरात गॅस, मंत्रिमंडळाचा निर्णय : जन-जल-जंगल-जमीन यांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 5:33 AM

विशेष प्रतिनिधी मुंबई : जन-जल-जंगल-जमीन यांच्या शाश्वत विकासासाठी राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाºया डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची व्याप्ती वाढविली असून वनाशेजारील गावातील शंभर टक्के कुटुंबांना सवलतीच्या दरात गॅस पुरवठा करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.वनाशेजारील गावांतील लोक सरपणासाठी वनक्षेत्रात जातात. त्यामुळे वनातील हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात अशा नागरिकांचा मृत्यू अथवा ...

विशेष प्रतिनिधी मुंबई : जन-जल-जंगल-जमीन यांच्या शाश्वत विकासासाठी राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाºया डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची व्याप्ती वाढविली असून वनाशेजारील गावातील शंभर टक्के कुटुंबांना सवलतीच्या दरात गॅस पुरवठा करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.वनाशेजारील गावांतील लोक सरपणासाठी वनक्षेत्रात जातात. त्यामुळे वनातील हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात अशा नागरिकांचा मृत्यू अथवा जखमी होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यासोबतच जळावू लाकडासोबत झाडांना नव्याने आलेल्या फुटव्याची जाणता-अजाणता तोड होत असल्याने वन संपदेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. तसेच स्वयंपाकासाठी लाकडाचा वापर केल्याने धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. महिलांचे आरोग्य तसेच राज्यातील वनांचे संरक्षण आणि त्यांच्यावरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला.कांदळवन संरक्षणासाठी सरकारची विशेष योजनासमुद्र किनाºयांचे संरक्षण तसेच नैसर्गिक आपत्तींना प्रतिबंध करण्यासाठी महत्त्वपूर्ण कांदळवनांचे (मँग्रोव्हज) संवर्धन करण्यासह लोकांना उपजिविकेची साधने उपलब्ध करून देण्यासाठी कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना चालू वर्षापासून राबवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या योजनेंतर्गत कांदळवन सह व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येईल. संबंधित क्षेत्राचे वनपाल किंवा वनरक्षक समितीचे सचिव असतील. ही समिती कांदळवनांच्या दर्जात वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल. त्यात शासनाचा ९० टक्के तर समितीचा १० टक्के आर्थिक सहभाग राहील. या योजनेंतर्गत पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ५० गावांची निवड करण्यात येणार आहे.धर्मादाय आयुक्तांना अधिकाराबाबत अध्यादेशसार्वजनिक न्यासाच्या विश्वस्तांनी धर्मादाय आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय केलेल्या मालमत्तेच्या हस्तांतरण व्यवहारांना पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला होता. मात्र, ही मान्यता महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था (दुसरी सुधारणा) अधिनियम-२०१७ अंमलात येण्याच्या दिनांकापूर्वी पूर्ण झालेल्या व्यवहारांसाठी लागू करण्यात येईल. त्याचे अधिकार फक्त धमार्दाय आयुक्तांना देण्यासाठी अध्यादेश काढण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.नागपूर-नागभीड ब्रॉडगेजसाठी ३५४ कोटीमुंबई-नागपूर - नागभीड हा नॅरो गेज रेल्वे मार्ग ब्रॉड गेजमध्ये रुपांतरित करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने तयार केलेल्या ७०८ कोटी ११ लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक स्वीकारताना त्यासाठी राज्याच्या हिश्याची ५० टक्के रक्कम म्हणजे ३५४ कोटी रुपये देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या मागार्मुळे विदभातील मागासलेल्या भागासह नक्षलग्रस्त भागाचाही विकास होण्यास मोठी मदत होणार आहे. ११६ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे.