पुणे : आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंड्यांना अखेर सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.बैठकीमध्ये प्रत्येक दिंडीला पालखी सोहळा कालावधीत किमान ८ ते १० गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्याचे तिन्ही गॅस कंपन्यानी मान्य केले. यासाठी पालखी मार्गावर सिलिंडर पुरवण्यासाठी खास वाहन तैनात करण्यात येणार आहे. सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर मिळण्यासाठी प्रत्येक दिंडीला आपले बँक खाते उघडावे लागणार आहे. केंद्राने गेल्या दोन वर्षांपासूनगॅस सिलिंडरसाठी देण्यात येणारे अनुदान थेट संबंधित ग्राहकांच्याबँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक बँक खातेआधार क्रमांकाशी जोडण्यात आले आहे. (प्रतिनिधी)> गत वर्षीपासून आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंड्यांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये अनेक दिंडी मालकांना आपल्या वैयक्तिक गॅस सिलिंडरमधून दिंडीसाठी गॅस खरेदी केल्याने एकाच वेळी सहा ते सात गॅस सिलिंडर पंधरा दिवसांत संपतात. त्यात शासनाचे वर्षाला बाराच अनुदानित गॅस सिलिंडर देण्याचे बंधन घातले आहे. यामुळे यंदा सर्वच बैठकांमध्ये वारकऱ्यांनी व दिंड्या मालकांनी सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
वारकऱ्यांना सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर
By admin | Published: June 08, 2016 3:22 AM