शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
3
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
4
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
5
"अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
7
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
8
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
9
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
10
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
11
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
12
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
13
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
14
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
16
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
17
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
18
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
19
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
20
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला

‘त्या’ टँकरमध्ये तीन हजार सिलिंडर भरतील इतका गॅस

By admin | Published: July 05, 2017 6:32 AM

घोडबंदर रोडवर सोमवारी उलटलेल्या एलपीजी टँकरमध्ये जवळपास दोन हजार ९00 गॅस सिलिंडर्स भरता येतील, एवढा अतिज्वलनशील

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घोडबंदर रोडवर सोमवारी उलटलेल्या एलपीजी टँकरमध्ये जवळपास दोन हजार ९00 गॅस सिलिंडर्स भरता येतील, एवढा अतिज्वलनशील वायू होता, अशी धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे. त्यामुळे अपघातात या टँकरचा स्फोट झाला असता तर १०० चौरस फूट परिघात मोठी जिवीत आणि वित्तहानी झाली असती. परंतु, सुदैवाने पोलीस आणि अन्य प्रशासनाने खबरदारी घेतल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, अपघातग्रस्त टँकरमधील ज्वलनशील वायू दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचे काम मध्यरात्री जवळपास दोन वाजेपर्यंत सुरु होते. अपघातानंतर फरार झालेल्या टँकर चालकाविरूद्ध काशिमिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.ठाण्यातून वसईच्या दिशेने जाणारा एलपीजीचा टँकर सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास काजूपाड्याजवळ उलटला. या टँकरमधून अतीज्वलनशील वायूची गळती सुरु झाल्याने अत्यंत वर्दळीच्या अहमदाबाद-मुंबई महार्गावरील घोडबंदर रोडवर दोन्ही बाजूंची वाहतूक सोमवारी रात्री १0 वाजेपर्यंत ठप्प होती. मदतकार्यासाठी उरण येथून भारत पेट्रोलियमच्या तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी टँकरमधून होणारी वायू गळती रोखली. त्यानंतर अपघातग्रस्त टँकर रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी नेऊन त्यातील वायू दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यात आला. सिलिंडरचा स्फोट आणि एलपीजीने भरलेल्या टँकरच्या स्फोटाची तुलना करता येत नाही. टँकरचा स्फोट हा तुलनात्मकदृष्ट्या अतिशय तीव्र असतो. टँकरचा स्फोट झाला असता किमान १00 चौरस फुटाच्या परिसरातील वाहने आणि इमारती खाक झाल्या असत्या, असा अंदाज रसायन क्षेत्रातील तज्ज्ञ उल्हास ठाकूर यांनी व्यक्त केला.या दुर्घटनेमुळे कोणतीही काळजी न घेता रस्त्यांवरून धावणाऱ्या टँकररूपी मृत्युदुतांचे दर्शन घडले. या टँकरमधील वायू जर काळजीपूर्वक काढता आला नसता, तर भीषण परिस्थिती ओढवली असती.ंदरम्यान सोमवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास टँकर रस्त्याच्या कडेला घेतल्यानंतर वाहतूक सुरु करण्यात आली. परंतु,अपघातग्रस्त टँकरमधील वायू दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचे काम मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरु होते. टँकरच्या वरच्या भागात चार प्रेशर वॉल्व असतात. अपघातानंतर त्यापैकी एका प्रेशर वॉल्वजवळच्या ‘वॉल’चे (जाड धातूची भिंत) नुकसान होऊन वायू गळतीस सुरुवात झाली होती. टँकरचा स्फोट होऊ नये यासाठी या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. टँकरच्या जवळपास मोबाईल फोन वापरण्यासही मज्जाव करण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकरमध्ये जवळपास 40 मेट्रिक टन एलपीजी होता. एका ट्रकमध्ये साधारणत: 300गॅस सिलिंडर्स मावतात. एका सिलिंडरमध्ये साधारणत: 14 किलो गॅस असतो. त्यामुळे वाहतुकीसाठी जवळपास १0 ट्रकमध्ये मावतील एवढे गॅस सिलिंडर्स या वायूने भरता आले असते. टँकरमधील वायू हवेत मिसळताच त्याचे प्रसारण होते. एक लिटर वायू हवेमध्ये मिसळल्यास जवळपास 250 लिटरमध्ये त्याचे प्रसारण होते. एवढ्या शक्तिशाली वायूने भरलेला टँकर जवळपास नऊ तास अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर पडून होता.खबरदारी म्हणून ठाणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत कदम शेवटपर्यंत जातीने घटनास्थळी हजर होते.