लोकमत न्यूज नेटवर्कउरण : शहरातील घराघरात गॅस पाइपलाइनचे कनेक्शन पोहोचवणार आहे. २० वर्षांनंतर उरणमधील पाइपलाइनमधून गॅस पुरवठा योजनेचे स्वप्न साकार झाले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस राज्य मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. शहरातील पाइपलाइनचे उद्घाटन व रस्त्यांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. उरणमधून मागील चाळीस वर्षांपासून संपूर्ण देशात ऊर्जा पोहोचिवण्याचे काम सुरु आहे. या शहराला पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्याचे काम पूर्ण झाले असून, तीन वर्षांच्या कालावधीत पनवेल, कर्जत, अलिबाग, महाड, माणगाव, रोहा, जिंदाल व रिलायन्स या सर्व ठिकाणी गॅस पुरवठा होत आहे. या गॅस जोडणीसाठी फक्त ५00 रु पये अनामत रक्कम ठेवण्यात आली आहे. पाइपलाइनचा शुभारंभ ओएजीसी प्रकल्पाजवळील एका गरीब कुटुंबातून करण्यात आला. उरणला स्मार्ट सिटी बनवून नवा आदर्श निर्माण करू, असा विश्वास यावेळी राज्याचे वित्त, वने आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. उरण शहराच्या विकासासाठी सुमारे ५४ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, टाऊन हॉलच्या नवीन उभारणीसाठी १२ कोटी नगरपालिकेकडे आल्याचे माजी नगराध्यक्ष महेश बालदी यांनी सांगून संपूर्ण कोकणपट्टीत पाइपलाइन द्वारे गॅस पुरवठा देण्याचे काम उरणमध्ये प्रथम झाल्याचे सांगितले.
उरणमध्ये पाइपद्वारे गॅस पुरवठा - धर्मेंद्र प्रधान
By admin | Published: June 07, 2017 3:35 AM