शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

समतेची शिकवण देणारी सोलापूरची गड्डायात्रा

By admin | Published: January 14, 2017 1:52 PM

- गड्डायात्रा नावाने ओळखली जाणारी पाच दिवस चालणारी सिध्दरामेश्वर महायात्रा सोलापूरात भक्तिपूर्ण उत्साहात सुरू आहे.

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. १४ - गड्डायात्रा नावाने ओळखली जाणारी पाच दिवस चालणारी सिध्दरामेश्वर महायात्रा सोलापूरात भक्तिपूर्ण उत्साहात सुरू आहे. त्या निमित्त बसवकालीन संत, समतावादी विचारवंत, संवेदनशील मनाचा कवी- वचनकार, जातिविरहीत- श्रमाधिष्ठित समाज निर्मितीचा ध्यास घेतलेला समाजसुधारक अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचा शरण सिध्दरामेश्वर तथा सिध्दरामय्या आणि एकूणच गड्डायात्रे विषयी.....
 
 
स्त्रियांच्या नजरांच्या बाणांनी जो विचलित होत नाही तोच खरा शूऱ
क्रोधाचा अग्नी जो सहजपणे शमवितो तोच खरा शूऱ
लोभरूपी शस्त्राला जो घाबरत नाही तोच खरा वीऱ
मोहरूपी शृंखला जो तोडू शकतो तोच खरा वीऱ 
अज्ञानरूपी शत्रूला जो पाठ दाखवत नाही तोच खरा पराक्रमी़
हे सर्व सद्गुण आपल्या ठायी एकवटले आहेत, सिध्दरामा
(राघवांक विरचित श्री सिध्दरामचरित्रे या कन्नड ग्रंथातून)
 
सोलापूरची गड्डा यात्रा म्हणून सर्वपरिचित असणारी व पाच दिवसांचे भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन येणारी मकरसंक्रांत सोलापूर पंचक्रोशीसह  शेजारच्या कर्नाटक व आंध्रप्रदेशातील सीमावर्ती भागातही स्वतंत्र ओळख ठेवून आहे़
सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिध्दरामेश्वर हे योगीकुलचक्रवर्ती या उपाधीने ओळखले जाणारे एकमेव संत़  सिध्देश्वर, सिध्दरामेश्वर अशा दोन्ही नावांनी ओळखले जाणारे सिध्देश्वर कृषक कुळातील लोकपुरूष आहेत़ ते कन्नड भाषेतील संवेदनशील कवी (वचनकार)होते़ त्यांनी व्यापक समाजहिताचा ध्यास घेत अनेक लोकोपयोगी कामे केली़श्रमाधिष्ठित समाज रचना हा त्यांच्या विचारांचा पाया होता़त्यांनी अनेक धरणे, तळी बांधल्याचा उल्लेख त्यांच्या व समकालीन संतांच्या वचनात सापडतो़ स्वत: सिध्देश्वरांनी ६८ हजार वचन लिहिल्याचा उल्लेख त्यांच्याच वचनात आढळतो़  
ते म्हणतात ''अडुसष्ट हजार वचने गाऊन गाऊन माझे मन थकून गेले आहे़ आता ऐहिक विषयांचा त्याग करून विषरहित मनाने कपिलसिध्द मल्लिकार्जुनाच्या स्वरूपाशी एकरूप होण्याचे एकच वचन गायचे आणि अनुभवायचे आहे'.
मल्लिकार्जुन त्यांचे आराध्यदैवत तर कपिलसिध्द मल्लिकार्जुन हे त्यांचे अंकित नाम आहे़ सिध्देश्वरांच्या आज उपलब्ध असलेल्या चरित्रापैकी कन्नड महाकवी राघवांक यांनी लिहिलेले सिध्दरामचरित्रे हा चरित्रग्रंथ आद्य मानला जातो़ ६८ हजार वचनांचा उल्लेख त्यांच्या वचनात आला असला तरी आज त्यांची सुमारे दोन हजार वचने उपलब्ध आहेत़ सिध्देश्वरांवर बसवादि शिवशरणांचा प्रभाव राहिला आहे़ आपल्या वचनांतून सिध्देश्वरांनी महात्मा बसवेश्वरांचा अतिशय आदर आणि गौरवाने उल्लेख केल्याचे आढळून येते़ बसवादि शरणांची महती ऐकून ते कल्याणमंटपाला गेल्याचा उल्लेख अनेक वचनांत मिळतो़
सिध्देश्वरांनी सोलापूरच्या पंचक्रोशीत ६८लिंंगांची स्थापना केली़त्याचबरोबर अष्टविनायक यांचीही स्थापना केल्याचा उल्लेख कवी राघवांक यांनी लिहिलेल्या सिध्दरामचरित्रात आहे़ ६८ लिंग व अष्टविनायकांच्या स्थापनेबाबतच्या अनेक कथा,उपकथा आणि आख्यायिका सांगितल्या जातात.
 
यात्रेतील ७ नंदीध्वज
सिध्देश्वर यात्रेत विविध जातीचे सात नंदीध्वज सहभागी होतात़ त्यामुळे खºया अर्थाने ही सर्वसमावेशक असल्याचे दिसून येते़ यात्रेत बारा बलुतेदार, अठरापगड समाजघटकांना मान असल्याचे दिसते़ हलगी, संबळ,वाजंत्रीवाले यांच्यासह प्रत्येक समाजघटकाला यात्रेत मानाचा विडा आहे़म्हणूनच ही यात्रा केवळ एका समाजाची किंवा जातीची न राहता संपूर्ण सोलापूरची राहिली आहे.
 
यात्रेचा पोशाख खास बाराबंदी
पांढरेशुभ्र धोतर, फेटा , अंगात शर्ट आणि त्यावर बाराबंदी असा यात्राकाळातील पोशाख लक्ष वेधून घेतो़नंदीध्वज मिरवणुकीत सहभागी होणाºयांसाठी हा पोशाख पावित्र्याचा तितकाच प्रतिष्ठेचाही मानला जातो़ हा ड्रेसकोडच मानला जातो़ आजच्या पोशाखातून हद्दपार झालेली ‘बाराबंदी’ गड्डा यात्रेत पाहण्यास मिळते़
 
अशी आहे कथा
सिध्देश्वरांच्या नित्य पूजेच्या वेळी फुले आणणे, रांगोळी काढण्याचे काम एक कुंभार कन्या मनस्वी करत असे़ ही कुंभार कन्या मनोमन सिध्देश्वरांवर लुब्ध होऊन त्यांच्याशी विवाहाची इच्छा व्यक्त केली़ तिची इच्छा अर्थातच सिध्देश्वरांना मान्य होणे अशक्य होते़ आपण स्वत: आपले आराध्य दैवत चन्नमल्लिकार्जुनास पती मानले आहे़ म्हणजे एक पत्नी (स्त्री)दुसºया स्त्रीशी लग्न कशी करेल, असा सवाल केला़ तरीही कुंभार कन्येने विवाहाचा हट्ट सोडला नाही़ शेवटी आपल्या योगदंडाशी विवाह करण्याची परवानगी सिध्देश्वरांनी तिला दिली़ म्हणूनच यात्रेतील नंदीध्वज हे कुंभार कन्येचे म्हणजे वधूचे प्रतीक आहेत़ सम्मती कट्ट्यावर होणारा अक्षता सोहळा सिध्देश्वरांचा योगदंड आणि कुंभार कन्येच्या विवाहाचा असतो़ दुसºया दिवशी ती वधू सती जाते़ कुंभार कन्येचा सती जाण्याचा सोहळा म्हणजेच यात्रेच्या तिसºया दिवशीचा (मकरसंक्रांत)होम विधी कार्यक्रम़ कुंभार कन्येच्या प्रतिकात्मक विवाह सोहळ्याची वरात आणि सती (होम) सोहळा असे पाच दिवस चालणाºया या गड्डा यात्रेचे वर्णन करता येईल़ या लग्न सोहळ्यातील वर म्हणजे सिध्देश्वरांचे योगदंड (प्रतिकात्मक नंदीध्वज)
पहिल्या दिवशी होणारे यण्णीमज्जन (तैलाभिषेक) प्रतिकात्मक लग्नापूर्वीचा हळदीचा कार्यक्रम अशा स्वरूपाचा मानला जातो़
 
‘दिड्डम दिड्डम.. सत्यम सत्यम’ 
सिध्देश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला हा कट्टा आहे़या ठिकाणी नंदीध्वजांचा अक्षता सोहळा होतो़नंदीध्वज मिरवणुकीने येथे आल्यानंतर ओळीने ठेवले जातात़ तलावात गंगापूजन(जलपूजन)झाल्यानंतर सम्मतीचे वाचन होते़ सम्मती म्हणजे होकार असा रूढ अर्थ असला तरी सम्मती म्हणजे सिध्देश्वरांनी रचलेल्या पाच मंगलाष्टका आहेत़या मंगलाष्टकांमध्ये सोलापूर पंचक्रोशीतील अष्टविनायक, ६८ लिंग आणि त्यांच्या जीवनातील घटनांचा उल्लेख होतो़ कन्नडसोबत संस्कृत आणि तेलुगू शब्दही सम्मतीमध्ये आढळतात़ सम्मती वाचनाच्या शेवटी ‘दिड्डम दिड्डम.. सत्यम सत्यम’ असे उच्चारताच दाहीदिशांनी अक्षता बरसतात़
 
असे होते होम
बाजरीच्या पेंड्या एकत्र करून कुंभार कन्येची प्रतिकृती तयार करण्यात येते़ तिला साडी नेसवून मणिमंगळसूत्र, बांगड्या, जोडवे घालण्यात येतात़ हार घालून दांडा बांधून विधिवत पूजा केली जाते़ ‘बोला... बोला... एकदा भक्तलिंग हर्र बोला.. हर्र.. सिद्धेश्वर महाराज की जय’च्या जयघोषात अग्नी दिली जाते़ 
 
भाकणूक
होमहवन झाल्यानंतर भाकणूक होते़दिवसभर उपाशी ठेवलेल्या गायीच्या वासराने दिलेल्या संकेतानुसार भाकणूक केली जाते़ यामध्ये पाऊसपाणी, तेजी-मंदी, नैसर्गिक आपत्ती, सुबत्ता, दुष्काळाची चिंता अशा स्वरूपाचे प्रामुख्याने शेतीशी संबंधित विषयांवर भकित केले जाते़ गड्डा यात्रेतील या भाकणुकीला आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात खूप महत्त्व आहे़
 
शोभेचे दारूकाम़़
यात्रेच्या चौथ्या दिवशी शोभेच्या दारूकामाची आतषबाजी करण्यात येते़यामध्ये राज्यातील फायरवर्क्स सहभागी होतात़
 
कप्पडकळी
कप्पडकळीचा सरळ अर्थ वस्त्र उतरविणे असा आहे़ कप्पडकळी हा गड्डा यात्रेतील शेवटचा विधी़ तैलाभिषेक, अक्षता सोहळा, होमप्रदीपन आणि शोभेच्या दारूकामापर्यंत यात्रेत चाललेल्या वºहाडी मंडळींची धावपळ या सोहळ्याने थांबते़विधिवत पूजा झाल्यानंतर मल्लिकार्जुन मंदिरात नंदीध्वजाचे वस्त्र काढले जातात़
 
सिध्देश्वरांचे चरित्र/आख्यायिका
श्री सिध्दरामेश्वरांच्या कार्यकाळाविषयी मतभेद असले तरी  बाराव्या शतकाच्या प्रारंभी त्यांचा जन्म झाल्याचे सर्वमान्य आहे़धारवाड विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या सिध्दराम शिवयोगी या ग्रंथात त्यांचा कार्यकाळ ११३० ते ११८० असे मानण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे़ सोन्नलगीच्या (सोलापूर) मुर्डी मुद्दगौडा आणि सुग्गव्वा(सुगलादेवी) या शिवोपासक वृध्द दांपत्याच्या पोटी सिध्दरामेश्वरांचा जन्म झाला़ शिवयोगी जगद्गुरू रेवणसिध्देश्वरांनी या दांपत्याला अनुग्रह करताना सोन्नलगीचा (सोलापूर) भूकैलास घडविणारा तेजस्वी योगीपुरूष जन्माला येणार असल्याचे सांगितले़  धुळीमहांकाळ (बाळ सिध्देश्वर)वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत अबोल स्वभावाचा होता़ गुरे राखताना  तो कुणाशी बोलत नसे़ गुरामागे रानात एकदा तेजस्वी जंगममूर्तींनी(मल्लय्या/ मल्लिकार्जुन) सिध्देश्वराला भेट देत दहिभाताची मागणी केली़ बालक सिध्देश्वर घरून दहिभात घेऊन परत येईपर्यंत मल्लय्या दिसेनासे झाले होते़त्यांचा माग घेत सिध्देश्वर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आंध्रप्रदेशातील श्रीशैलला पोहोचले़ मात्र तेथेही मल्लय्या न भेटल्याने शेवटी दरीत उडी घेताना त्याच्या उत्कट भक्तीला प्रसन्न होऊन मल्लय्याने त्याला अलगद उचलून घेतले़आणि आशीर्वाद देऊन सोन्नलगी येथे समाजकार्य करण्याचा संदेश दिला़ अशी कथा प्रचलित आहे़
 
मदनांतक सिध्दराम़़
सिध्दरामेश्वर योगीकुलचक्रव्रती होते़ सिध्देश्वरांनी  विकारांवर विजय मिळविला होता़ ते ब्रह्मचयार्चे मूतीर्मंत प्रतीक होते़ कामदेव-मदनाची मोहिनी सिध्दरामेश्वर यांच्यावर काहीही प्रभाव पाडू शकली नाही़ यासंदर्भात त्यांच्या चरित्रात आणि वचनांतही मदनाचा म्हणजेच कामदेवाचा संदर्भ आहे़ ती कथा अशी़ सिध्देश्वरांना विचलित करण्याचा, त्यांना पराभूत करण्याचा चंग बांधून कामदेव भूलोकी स्वर्ग असलेल्या सोन्नलगीला आला़ (सोन्नलगी -भू कैलास)सिध्देश्वरांना वश करण्यासाठी त्याने अनेक डाव टाकले़ प्रयत्नांची पराकाष्टा केली़ मात्र त्याला यश आले नाही़तो सर्व प्रयत्नात अपयशी ठरला़ विचलित न झालेल्या सिध्देश्वरांना  कामदेवाच्या प्रयत्नांचा रागही आला नाही़ निराश झालेल्या मदनाला ते म्हणाले, आपण एक स्त्री असून लिंगरूपी चन्नमल्लिकार्जन आपले पती आहेत़ म्हणूनच एक स्त्री दुसºया स्त्रीवर लुब्ध कशी होणार असा सवाल त्यांनी कामदेवाला केला़ 
बसवादी शरणांनी  सिध्देश्वरांचा मदनांतक म्हणून यथार्थ गौरव केला आहे़ सिध्देश्वांच्या या महतीचा गौरव बसवेश्वरांनी केला आहे़ ते म्हणतात, मदनावर विजय मिळविणारे, ब्रह्मचयार्चे प्रतिक मानले जाणारे तीनच व्यक्ती जगामध्ये झाले़ ते म्हणजे शुकमुनी, मारूती आणि आमच्या सोन्नलगीचा सिध्देश्वर होय.
 
स्वत:ला स्त्री म्हणून संबोधणारे सिध्देश्वर मातृहृदयी असल्याचची जाणीव त्यांची वचने वाचतांना पदोपदी होते़ भक्त म्हणजेच समजाप्रती असलेले प्रेम आणि करूणा  प्रत्येक मातेला आपल्या मुलांप्रति वाटणाºया प्रेमा इतकेच उत्कट असल्याचे जाणवते़
सिध्देश्वरांनी वासना,विलास आणि मोह यापासून स्वत:ला दूर ठेवण्याची विनंती ते आपल्या आराध्य दैवताला म्हणजेच कपिलसिद्ध मल्लिकाजुर्नाला वारंवार करताना दिसतात़  हे देवा, वासनेचा त्याग करून, सोन्याचा मोह दूर सारून ज्यांचे अंतकरण तुमच्या नामस्मरणाचे आश्रयस्थान झाले आहे अशा सद्भक्तांचे मला दर्शन घडवा, हे कपिलसिद्ध मल्लिकाजुर्ना, त्यांच्या चरणांचे दर्शन घडवून माझे रक्षण करा़ अशी विनवणी ते करतात़
निस्सीम भक्ती हे सिध्देश्वरांचे जीवनसार आहे़ कोणत्याही प्रकरणाचे कर्मकांड किंंवा विधी त्यांना मान्य नव्हते़ केवळ भक्ती आणि निस्सीम भक्ती हाच ईश्वर प्राप्तीचा मार्ग सिध्देश्वरांनी सांगितला आहे़ तू वेदप्रिय नाहीस,शास्त्रप्रिय नाहीस, नाद प्रिय नाहीस, स्त्रोत्र प्रिय नाहीस, युक्तीप्रिय नाहीस, मुक्तीप्रिय नाहीस,या सर्वांना तू असाध्य आहेस़ हे कपिलसिध्द मल्लिकाजुर्ना, तू भक्तिप्रिय आहेस, हे जाणून मी तुला शरण आलो आहे, तुम्ही माझे रक्षण करा़
सिध्देश्वरांच्या वचनांमध्ये ह्यआपले भक्तह्ण असा चन्नमल्लिकाजुर्नाला उद्देशून उल्लेख आला आहे़येथे भक्त म्हणजे एक समूह नव्हे तर सर्व समाज या अथार्ने त्यांना अभिप्रेत असावा़ समाजाच्या वेदना पाहून करूणामयी सिध्देश्वरांना वेदना होणे स्वाभाविक आहे़ ते म्हणतात,हे देवा तुमच्या भक्तांच्या वेदना माज्या वेदना होत़ त्यांचे दुख पाहून ते मी सहन करणार नाही़तुमच्या भक्तांबरोबर भांडणाºयावर मी रागावणाऱ कारण हे कपिलसिद्ध मल्लिकाजुर्ना, तुम्ही त्यांच्या मनात आहात़़ 
सिद्धेश्वरांनी त्यामुळेच भक्तांचा सहवास मागितला आहे़ हे देवा मी तुमचे गुण गाईन,स्तुती करीन,पदर पसरून मागेन आणि हट्ट करीऩतुमच्या भक्तांचा सहवास मला घडवा़हे देवा मी हेच पद तुम्हाला मागत आहे़ हे करूणाकर कपिलसिध्द मल्लिकाजुर्ना, माज्यावर कृपा करा़.
 
तलावातील मंदिऱ़
भोवताली तलावाचे पाणी आणि मधोमध भव्य मंदिर  अशी विलोभनीय रचना सोलापुरातील सिध्दरामेश्वरांच्या मंदिराची आहे़ म्हणजे तलावातील बेटावर हे मंदिर वसले आहे़ या मंदिरात सिध्देश्वरांची योग समाधी आहे़  तलावाभोवती (दोन बाजूंनी) किल्ल्याची तटबंदी आहे़ हा तलाव बांधताना  सप्तसिंधूंनी आशीर्वाद सिध्देश्वरांना दिल्याची आख्यायिका आहे़
 
बंदोबस्तासाठी दोन हजार पोलीस
यात्रा काळात तब्बल दोन हजार पोलिसांचे पथक तैनात करण्यात येते़    मिरवणूक मार्गावर सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक,  फौजदार, पोलीस आणि महिला शिपाई तैनात असतात़त्यांच्या मदतीला होमगार्ड्स आणि स्वयंसेवकही असतात़
पोलिसांनाही बाराबंदी 
नंदीध्वज मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी  पोलिसांचे खास पथक तैनात करण्यात येते व त्या पथकातील पोलिसांना बाराबंदी शिवण्यात येते. यामध्ये विशेष व गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांचा समावेश असतो़ 
 
संस्कार भारतीची रांगोळी
५ वर्षांच्या बालकांपासून ते ८० वर्षांच्या वृद्धापर्यंत सारेचजण तीन कि़मी़च्या रस्त्यावर पहाटेपासून रांगोळ्याच्या पायघड्यात मग्ऩ़़१५ वर्षांपासून प्रबोधनाचा संदेश़. प्रत्येक वर्षी वेगळी थीम़ गेल्या वर्षी ‘जल है तो कल है’  हा संदेश होता़  यंदाचा संदेश आता रांगोळीतूनच दिला जाणार आहे. हा उपक्रम  संस्कार भारतीच्या वतीने राबविला जातो़ मल्लिकार्जुन मंदिर ते सम्मतीकट्टा अशा तीन कि़मी़च्या अंतरावर रांगोळ्यातून सुंदर पायघड्यांनी सिध्दरामेश्वरांच्या सात काठ्यांचे स्वागत होते.
 
५० पोती रांगोळी अन एक हजार किलो रंग
तीन किलोमीटर रस्त्यावर मोठमोठ्या पायघड्या साकारण्यासाठी ५० पोती रांगोळी आणि एक हजार किलो रंग लागतो़ वर्षभरात समारंभ आणि उत्सवात संस्कार भारतीचे कार्यकर्ते रांगोळीचा उपक्रम राबवून जमवलेल्या मानधनातून यात्रा काळातला हा खर्च उचलतात़ कमी पडल्यास हा खर्च कार्यकर्ते स्वत:च करतात़ सासरी गेलेल्या तरूणी खास यात्राकाळात सोलापूर गाठून संस्कार भारतीच्या कलाकृ तीत सहभागी होतात़ निवडक ठिकाणी मोठमोठे गालिचे साकारत सोलापूरकरांना मोहून सोडले़ १५० कार्यकर्त्यांच्या पथकात ३० जणांचा एक गट आदल्या दिवशी रात्री दहा ते पहाटे ४ या आठ तासांत काठ्यांच्या मार्गावर मार्किंग करतो, दुसरा महिलांचा गट सकाळी सात ते दुपारी १ असे आठ तास मन लावून रांगोळी साकारतो़.