प्रभू पुजारी
पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, गोरगरिबांचे श्रद्धास्थान पांडुरंग आषाढी वारी काळात मिळालेल्या देणग्यांमुळे कोट्यधीश झाला आहे.
आषाढी वारी काळात म्हणजेच ३ ते १७ जुलैदरम्यान लाखो भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले़ आषाढीच्या १५ दिवसांच्या कालावधीत मंदिरे समितीला विविध माध्यमांतून एकूण ४ कोटी ४० लाख ३७ हजार ७८६ रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात १ कोटी ५० लाख रुपयांची विक्रमी वाढ झाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
आषाढी यात्रा काळात भाविकांनी विठ्ठलचरणी ३९ लाख ६३ हजार ४२४ रुपयांचे दान तर रुक्मिणीमातेच्या चरणी ७ लाख ७२ हजार १८० रुपयांचे दान अर्पण केले आहे.
देणगी स्वरुपातून १ कोटी ८४ लाख ५४ हजार ९१ रुपये, बुंदी व राजगिरा लाडू प्रसादाच्या विक्रीतून ७२ लाख ४६ हजार २१० रुपये, नव्याने बांधलेल्या श्री विठ्ठल-रूक्मिणी भक्तनिवासाच्या माध्यमातून १८ लाख ९१ हजार, वेदांता व व्हिडीओकॉन भक्तनिवास ३ लाख ५० हजार ४०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे़ २०१८ मध्ये आषाढी वारी काळात हे दान २ कोटी ९० लाख रुपये होते.
स्वयंसेवकांची सेवाआषाढी वारी काळात भारत सेवाश्रम (कोलकात्ता), वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट (मुंबई), कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट (कराड), रेडक्रॉस सोसायटी, हरित वारी परिवार, स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज यासह अन्य संस्थांनी वैद्यकीय सुविधा, पाणी वाटप, स्वच्छता, देणगी जमा करण्याकामी मदत आदी सेवा बजावल्या होत्या.
यामुळे वाढले उत्पन्ऩ़़आषाढी वारी काळात मंदिरे समिती व प्रशासनाने वारकºयांच्या सोयीसाठी ६५ एकर परिसरात ३ लाख वारकºयांच्या निवासाची सोय केली. नदीपात्रात ७० टक्के भाग रिकामा ठेवला. त्यामुळे वारकºयांना स्रान केल्यानंतर वाळवंटात भ्रमण करण्याचा व नौकाविहाराचा आनंद घेता आला. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत एसडीआरएफचे जवान तैनात केले होते. दर्शन रांगेत भाविकांच्या पायाला त्रास होऊ नये म्हणून ग्रीन कार्पेट मॅटिंग टाकले होते. दर्शन रांगेची उत्तम व्यवस्था केली होती. दर्शन रांगेतील भाविकांना चहा, पाणी, फराळ व अन्नदान केले होते. भाविकांना अशा विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यानेच भाविकांनीही पांडुरंगचरणी भरभरून दान दिले.