‘’गौतमी पाटील बैलासमोर नाचेल नाहीतर…’’ प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराची अजित पवार यांनी घेतली फिरकी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 01:39 PM2023-04-29T13:39:25+5:302023-04-29T13:40:32+5:30
Ajit Pawar: एका व्यक्तीने गौतमी पाटील (Gautmi Patil) हिच्या नर्तनाचा कार्यक्रम बैलांसमोर ठेवल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. त्यावरून एका पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी या पत्रकाराची चांगलीच फिरकी घेतली.
गेल्या काही काळापासून नृत्यांगना गौतमी पाटीलचं नाव राज्यातील तरुण वर्गामध्ये कमालीचं लोकप्रिय झालं आहे. तिच्या नृत्याच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, काही घटनांमुळे तिच्यावर टीकाही होत असते. दरम्यान, एका व्यक्तीने गौतमी पाटील हिच्या नर्तनाचा कार्यक्रम बैलांसमोर ठेवल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. त्यावरून एका पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी या पत्रकाराची चांगलीच फिरकी घेतली.
मावळमध्ये एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये गौतमी पाटील ही बैलासमोर नाचली, असा प्रश्न विचारत एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारल्यावर अजित पवार म्हणाले की, ती नाचली असेल तर तुला का वाईट वाटतं. ती बैलासमोर नाचेल किंवा आणखी कुणासमोर नाचेल, तुला का त्रास होतोय. मी कार्यक्रमात वेगळं सांगितलं होतं. मी म्हणालो होतो की, आता जत्रा सुरू आहेत. त्यानिमित्त ग्रामीण भागात करमणुकीसाठी तमाशे बोलावले जातात. तर सध्या हे गौतमी पाटीलचं नाव गाजतंय. त्यामुळे पाटलीण बाईंना आणा, असं मी सुचवलं होतं. तरीदेखील बारशाच्या निमित्ताने नाचलं पाहिजे, तुमची सुपारी कितीची आहे. तेवढे पैसे द्यायला तयार आहे. तिचं काम आहे. ती करणार. आता बैलाला सांगितलं. कदाचित बैलाचा वाढदिवस असेल. किंवा बैल शर्यतील पहिला आला असेल. मालक त्या बैलाला म्हणाला असेल, तू पहिला ये मग डान्स दाखवू, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली.
दरम्यान, डान्सर गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्या ती चक्क बैलासमोर नाचताना दिसत आहे. मुळशीतील एका नेत्याच्या मुलाच्या मांडव टिळा कार्यक्रमात गौतमीने 'बावऱ्या' बैलासमोर लोकप्रिय 'चंद्रा' गाण्यावर डान्स केल्याचे सांगितले जात आहे. गौतमी पाटीलच्या डान्सचे आतापर्यंत अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. मात्र हा व्हिडिओ वेगळाच आहे. मुळशी तालुक्यात सुशील हगवणे युवा मंचाच्या वतीने मांडव टिळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्टेजमोरच चक्क बैलाला बांधण्यात आले होते. बैलाचं नाव 'बावऱ्या' असं आहे. बावऱ्या बैल म्हणजे गावाची शान असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. या बैलाने अनेक बैलगाडा शर्यती गाजवल्या आहेत. बैलासमोर डान्स करतानाचा गौतमीचा व्हिडिओ आता प्रचंड चर्चेचा विषय ठरलाय.