अनिरुद्ध पाटील,
डहाणू/बोर्डी- बोर्डी आणि परिसरातील गावांमध्ये उन्हाळी मोसमातील फळे बाजारात डेरेदाखल झाली आहेत. फळ्बागायतीमधील फळांप्रमाणेच पश्चिम घाटाच्या जंगलातील रानमेवा खास पसंतीला उतरत आहेत. दरवर्षी या हंगामात येणाऱ्या फळांची चव चाखण्यासाठी बोर्र्डीमध्ये येणाऱ्या परगावतील पर्यटकांची संख्याही वाढताना दिसत आहे.डहाणू हा बागायतदारांचा तालुका म्हणून ओळखला जातो. बोर्डी परिसरात विविध फळांच्या बागायती दिसून येतात. चिकू या फळाने घोलवड आणि बोर्डी गावांना जागतिक बाजारपेठेत विशेष ओळख दिली आहे. चिकू फळाप्रमाणेच येथे नारळ, आंबा, लिची, पफणस, सफेद जांभू आदि फळांच्या बागायती आहेत. या पैकी नारळ वगळता अन्य फळे उन्हाळी हंगामात येणारी मोसमी फळे आहेत. मे महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात ही फळे बाजारात येत असून, या वर्षीही ही फळे डेरेदाखल झाली आहेत. गेल्या वर्षी लिची प्रती डझन ४० रु. होती. या वर्षी त्यामध्ये १० रु पयांनी वाढ झाली आहे. सफेद जांभूळ २० रु. डझन, आंबा ७० रु. किलो दराने विकले जात असून, घावूक बाजारातील दरात कमी-अधिक प्रमाणात फरक दिसून येतो. सध्या बोर्डी परिसरात मुंबई व इतर परिसरातून पर्यटक वाढत असतांना फळांची विक्री जोर पकडू लागली आहे.या परिसरातून रेल्वेने मुंबई आणि परिसरात भाजीपाला घेऊन जाणाऱ्या महिलांमुळे शहरातील खवयांना फळांची चव चाखता येत आहे. मे महिना हा उन्हाळी पर्यटनाचा हंगाम असल्याने डहाणू आणि बोर्र्डी पर्यटनस्थळी भेट देणारे परगावतील पर्यटक या फळांचा यथेच्च आस्वाद घेताना दिसत आहेत. या फळांच्या उपलब्धतेमुळे सर्वच स्तरातील स्थंनिकांना रोजगार संधी निर्माण झाली आहे. एकंदरत इतर ठिंकाणी उन्हाची काहिली असली तरी बार्डीमध्ये हा व्यावसायाचा काळ आहे.येथील पश्चिम घाटाच्या जंगलातून उपलब्ध होणारा रानमेवाही बाजारात आला असून, ताडगोळे ५० रु. डझन, करवंद आणि राजण १० रु. वाटा, तर काळी जांभळे २०० रु. किलोने विकली जात आहेत. डहाणू बोर्डी मार्ग, डहाणू, घोलवड व उंबरगाव रेल्वे स्थानक तसेच स्थानिक आठवडे बाजारात ही फळे विक्र ीसाठी माठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहेत.