ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 09 - रेल्वे अपघात घडवून मोठी जीवितहानी करण्याचं षडयंत्र असल्याचा संशय आता दृढ होऊ लागला आहे. पनवेलजवळ रेल्वेच्या ट्रॅकवर वीजेचा पोल टाकल्याची घटना ताजी असतानाच, आता तळोजा- नावडेदरम्यान रेल्वे ट्रॅकवर जिलेटीनच्या कांड्या आढळल्या आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील तळोजा-नावडेदरम्यान रेल्वे ट्रॅकवर जिलेटीनच्या चार कांड्या आढळून आल्या आहेत. कालच पनवेलमधील गव्हाणफाट्याजवळ रेल्वे ट्रकवर वीजेचा पोल टाकण्यात आला होता. तर परवा कळंबोलीजवळ रेल्वे ट्रॅकवर रुळाचा तुकडा ठेवण्यात आला होता.
दरम्यान, तळोजा पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून हा घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.