मुंबई : कला, क्रीडा, चित्रपट, रंगभूमी, विज्ञान, तंत्रज्ञान, बिझनेस, इन्फ्रास्ट्रक्चर, समाजकारण, राजकारण, प्रशासन अशा विविध क्षेत्रांतील आपल्या पसंतीचे मानकरी ठरवण्यासाठी आणि त्यांची लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयरचे आपल्या पसंतीचे मानकरी निवड करण्यासाठी आतापर्यंत लोकमतच्या दहा लाखांहून अधिक नेटवाचकांनी मतदान केले असून, मतांचा ओघ अद्यापही संपलेला नाही. त्यामुळे यंदा महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कारांबाबत ज्यांची नामांंकने झाली आहेत, त्यांच्याबरोबरच वाचकांचीही उत्सुकता कमालीची वाढत चालल्याचे दिसत आहेत.या पुरस्कारांसाठी लोकमतच्या लाखो वाचकांनी मतदान केल्याने मराठी महाराष्ट्रीयन माणसाचे लोकमतवरील प्रेम जसे दिसून आले, तसेच मराठी माणून आणि लोकमतचा वाचक अधिकाधिक नेटसॅव्ही होत चालल्याचेही सिद्ध झाले. लक्षणीय बाब म्हणजे नेटद्वारे आपला कौल देणाऱ्यांमध्ये ग्रामीण वाचकांची संख्याही मोठी आहे. ज्युरी आणि लोकमतचे वाचक यांच्या मतांतूनच विविध क्षेत्रांतील महाराष्ट्रीयन आॅफ द इयर ठरणार असल्याचे आपले मत निर्णायक ठरावे, यासाठी वाचकांचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. ज्यांना या पुरस्कारासाठी नामांकने मिळाली आहेत, ते सर्व जण आपापल्या क्षेत्रांतील दिग्गज तर आहेतच, पण त्यांची लोकप्रियताही खूप मोठी आहे, त्यांच्यापैकी काही शहरी आहेत, तर काही ग्रामीण भागांतून येउन संपूर्ण महाराष्ट्रात आपली ठसा उमटवणारे आहेत. या दिग्गजांचे आपापल्या क्षेत्रातील कार्य सकारात्मक आणि प्रेरणादायक असल्याचे त्यांच्यापासून स्फूर्ती घेत आणखी असे नामवंत महाराष्ट्रात तयार व्हावेत, अशी लोकमची भूमिका आणि इच्छा आहे.हा सोहळा १ एप्रिल रोजी मुंबईत होणार असून, त्यासाठीचे मतदान बुधवार, ३0 मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता बंद होणार आहे. तोपर्यंत नेटमतदारांची संख्या आणखी काही लाखांनी वाढेल, असा अंदाज आहे. मोठ्या दिमाखात होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला राजकारण, समाजकारण, चित्रपट, संगीत, रंगभूमी, प्रशासन, उद्योग, व्यवसाय अशा सर्व क्षेत्रांमधील सेलिब्रिटी कलाकार, नेते आणि मान्यवर हजेरी लावणार आहेत. लोकांचे मताचा मान ठेवणारा हा समारंभ त्यामुळेच रंगतदार होणार आहे.
लाखोंच्या मतांतून ठरणार महाराष्ट्राची रत्ने
By admin | Published: March 30, 2016 2:40 AM