शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

Maharashtra| हवीहवीशी ‘ती’ झाली पुन्हा नकाेशी; राज्यात मुलींचे लिंगगुणाेत्तर प्रमाण घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 2:00 PM

महाराष्ट्रात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने घटत आहे...

- ज्ञानेश्वर भाेंडे

पुणे : आपण स्वत:ला पुराेगामी म्हणताे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नाराही देताे. इतकेच काय मुलीच्या जन्माचे स्वागत करीत त्याचे काैतुक साेहळेदेखील करताे. वरकरणी आपण ‘मुलगा - मुलगी समान’ मानत असलाे तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती याविरुद्धच दिसून येत आहे. कारण, महाराष्ट्रात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने घटत आहे. हे प्रमाण ९१९ वरून ९०६ वर घटले आहे. यावरून पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी आणखी कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे.

राज्यात दरवर्षी दर हजार मुलांच्या तुलनेत किती मुली जन्माला आल्या त्यावरून ‘लिंग गुणाेत्तर प्रमाण’ (सेक्स रेशाे) काढले जाते. आराेग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, सन २०१९ मध्ये राज्यात ९ लाख १० हजार मुलांचा जन्म झाला तर ८ लाख ३६ हजार मुली जन्मल्या. म्हणजेच मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या ७३ हजारांनी घटली व लिंगगुणाेत्तर प्रमाण ९१९ इतके हाेते. सन २०२० ला ८ लाख ९४ हजार मुले जन्माला आली तर ८ लाख १६ हजार मुली जन्मल्या. त्या वर्षी ७७ हजार कमी मुली जन्मल्या व लिंग गुणाेत्तराचे प्रमाण ९१३ वर आले. तर २०२१ मध्ये ९ लाख १ हजार मुलांचा तर ८ लाख १६ हजार मुलींचा जन्म झाला. म्हणजेच ८४ हजार ७३४ मुली कमी जन्माला आल्या व लिंग गुणाेत्तर ९०६ इतके घटले.

समाधानाची बाब म्हणजे २०१९ च्या आधी सलग दाेन वर्षे मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढत हाेते. सन २०१७ ला हे लिंग गुणाेत्तर ९१३ (९ लाख ४४ हजार मुले, ८ लाख ६२ हजार मुली), सन २०१८ मध्ये ९१६ (९ लाख २१ हजार मुले, ८ लाख ४३ हजार मुली) व २०१९ मध्ये ते ९१९ (९ लाख १० हजार मुले, ८ लाख ३६ हजार मुली) असे समाधानकारक नाेंदविले गेले हाेते. त्यानंतर मात्र सातत्याने मुलींच्या जन्मात घट हाेत आहे. हे प्रमाण आणखी घटत राहिले तर सामाजिक असमताेल निर्माण हाेऊ शकताे.

गडचिराेली जिल्ह्यात समानतेचे वारे

सर्वांत कमी लिंग गुणोत्तर बुलढाणा जिल्ह्यात असून ते ८६२ इतके आहे; तर सर्वाधिक ९६२ हे गडचिरोली येथे नोंदवले गेले. गडचिराेली हा आदिवासीबहुल जिल्हा असला तरी तेथे समानतेचे वारे वाहत आहेत. या ठिकाणी गर्भलिंग निदानाची साधने कमी असल्याने मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढल्याचे मत सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व्यक्त करतात.

या जिल्ह्यांत ९००च्या आत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, अहमदाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, वाशीम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षी लिंगगुणाेत्तर ९००च्या आत आहे. तसेच कळ्यांना गर्भातच खुडणाऱ्या डाॅ. सुदाम मुंढेच्या बीड जिल्ह्यात हे प्रमाण गेल्या वर्षी ८९८ आहे. पुण्यात हे २०१९ ला ९०५, २०२० ला ९२४, तर २०२१ ला ९११ इतके नाेंदवले गेले.

पीसीपीएनडीटीची अंमलबजावणी हवी तीव्र

सन २०११ नंतर ‘प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक’ (पीसीपीएनडीटी) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली हाेती. त्यामुळे मुलींचे प्रमाण वाढले व आता पुन्हा कमी झाले आहे. काेराेनाकाळात सर्वाधिक अवैधरीत्या लिंगनिदानाचे व स्त्रीभ्रूणहत्येचे प्रकार घडले आहेत. यावरून आता पुन्हा मुलींचे प्रमाण आणखी घटू द्यायचे नसेल तर त्यासाठी ‘पीसीपीएनडीटी’ची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

बेकायदा लिंग तपासणीवर कडक कारवाई केली जात आहे. काेरोनाकाळातही "पीसीपीएनडीटी' कायदा आणि त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे केली आहे. लिंग गुणोत्तरातील असमानता ही एक सामाजिक समस्या आहे. त्याचे विश्लेषण अधिक सखोल पद्धतीने होणे आवश्यक आहे.

- डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य संचालक, महाराष्ट्र राज्य

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र