मुंबई : उच्च न्यायालयाने कान उपटल्यानंतर राज्य शासनाने दहावीची परीक्षा घेणाऱ्या २३१ परीक्षा केंद्रांना जनरेटर दिले आहेत़ तशी माहिती शासनाने शुक्रवारी उच्च न्यायालयात दिली़मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी ही माहिती दिली़ लोडशेडिंग होत असलेल्या परीक्षा केंद्रांना हे जनरेटर दिले असून, त्याची शहानिशाही करण्यात आल्याचे अॅड़ वग्यानी यांनी न्या़ अभय ओक व न्या़ अनिल मेनन यांच्या खंडपीठाला सांगितले़ त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी ३० सप्टेंबरपर्यंत तहकूब केली़ परीक्षा केंद्रांना अखंड वीजपुरवठा करण्याचे आदेश न्यायालयाने शासनाला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी यांनी केली आहे. त्यानुसार न्यायालयाने परीक्षा केंद्रांना अखंड वीजपुरवठा करण्याचे आदेश दिले होते़ त्याची अंमलबजावणी होत नसल्याने गवळी यांनी पुन्हा शासनाच्या विरोधात न्यायालयाच्या अवमानतेची याचिका दाखल केली़
कोर्टाच्या दणक्यानंतर दहावी परीक्षा केंद्रांना जनरेटर
By admin | Published: February 28, 2015 5:12 AM