लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात जेनेरिक औषधांची केंद्रे अधिकाधिक संख्येने सुरू करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यावर भर राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, नौकानयन आणि रसायने व खते राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज सायंकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, माजी मंत्री एकनाथ खडसे आदी उपस्थित होते.जेनेरिक औषधे स्वस्त आणि किफायतशीर असल्याने याचा फायदा अधिकाधिक रुग्णांना व्हावा यासाठी केंद्र शासन प्रयत्न करीत असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री मांडविया यांनी यावेळी सांगितले. केंद्र शासन राज्यांच्या सहकार्याने जेनेरिक औषधांची केंद्रे वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असून येत्या तीन वर्षात प्रत्येक तालुकास्तरापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
जेनेरिक औषधांची केंद्रे वाढविणार
By admin | Published: May 12, 2017 3:12 AM