शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
3
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
4
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
5
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
7
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
8
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
9
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
10
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
12
Video - इथे ओशाळली माणुसकी! पतीच्या मृत्यूनंतर गरोदर पत्नीने साफ केला रुग्णालयातील बेड
13
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
14
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
15
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
16
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
17
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
18
अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद 
19
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
20
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल

एसटी स्थानकांतील जेनेरिक औषधालयांचा मुहूर्त हुकणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 5:06 AM

कंत्राट नियुक्तीच्या वादाचा फटका; योजना लांबणीवर पडण्याची चिन्हे

- महेश चेमटे मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील २२ महिने रखडलेली जेनेरिक (स्वस्त दरातील औषधे) औषधालये दिवाळीच्या मुहुर्तावर सुरू होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, एसटी स्थानकांमध्ये ही औषधालये सुरू करण्यासाठी कंत्राट नियुक्तीवरून वाद सुरू असल्याने योजना लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यातील एसटी स्थानकांत जेनेरिक औषधालये सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, महामंडळातील तब्बल ६०९ एसटी स्थानकावर कंत्राट कोणत्या कंपनीला द्यायचे? यावरून सध्या महामंडळातील अधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू आहे. पहिल्या दोन निविदेत प्रतिसाद न मिळाल्यामुळे ७ जुलै रोजी औषधालयांसाठी तिसºयांदा निविदा मागविण्यात आल्या. या वेळी ६ निविदाकारांनी जेनेरिक औषधालयांबाबत स्वारस्य दाखविले, परंतु मर्जीतील निविदाकारांना कंत्राट मिळावे, यासाठी वरिष्ठ अधिकाºयांची मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, याला महाव्यवस्थापकांकडून होणाºया विरोधामुळे कंत्राटदारांची नियुक्ती सुमारे महिनाभरापासून प्रतीक्षेत आहे.प्रधानमंत्री भारतीय जन-औषधी परियोजनेंतर्गत राज्यातील सर्व नागरिकांना स्वस्त दरात औषधे मिळावीत, यासाठी आॅगस्ट २०१६ मध्ये एसटी महामंडळात जेनेरिक औषधालय सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. एसटी स्थानके ही मध्यवर्ती ठिकाणे असल्यामुळे प्रवाशांसह सर्वसामान्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल. मात्र, देशातील सर्वात मोठे प्रवासी महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाºया एसटी महामंडळातील अधिकाºयांच्या वादामुळे ‘आरोग्यदायी’ योजनेला मुहूर्त मिळेनासा झाला आहे.अद्याप निर्णय झालेला नाहीएसटी स्थानकांवर जेनेरिक औषधालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जेनेरिक औषधालयांच्या कंत्राटदारांच्या नियुक्तीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. कंत्राटदार नियुक्त केल्यानंतर औषधालय एसटी स्थानकात सुरू करण्यात येईल.- रणजित सिंह देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळgeneric Medicinesजेनरिक औषधं