कोल्हापूर : गेली पंधरा वर्षे ‘शेतकरी संघटनेचा नेता’ म्हणून दोन्ही काँग्रेसवाल्यांच्या घराणेशाही विरुद्ध आम्ही डंका पेटविला आणि माझाच सहकारी पुन्हा त्याच वाटेने जाणार असेल, तर ते माझ्या ‘इथिक्स’मध्ये बसत नाही, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी सोमवारी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याविषयी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत हा सांगली जिल्ह्यातील बागणी (ता. वाळवा) जिल्हा परिषद मतदारसंघातून रयत विकास आघाडीतून निवडणुकीस उभा आहे. त्यावर शेट्टी म्हणाले, नेत्यांनीच आपल्या पोरांना निवडणुकीत उभे केले, तर पक्षासाठी, संघटनेसाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? सदाभाऊंनी मुलाला निवडणुकीत उभे केले, हे मला पटलेले नाही. सत्तेचा मोह चांगला नाही. तो वेळीच आवरला पाहिजे, असेही शेट्टी म्हणाले.
सदाभाऊंची घराणेशाही शेट्टींना अमान्य
By admin | Published: February 14, 2017 12:56 AM