ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - पुण्यातील जर्मन बेकरी बाँबस्फोटातील आरोपी हिमायत बेगची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. 10 पैकी 9 आरोपांमधूनही न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केले आहे. एका आरोपामध्ये तो दोषी असल्यावर शिक्कामोर्तब करत मुंबई उच्च न्यायालयाने हिमायत बेगला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
पुण्यात २०१० मध्ये झालेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात १७ जणांचा मृत्यू, तर ५८ जण गंभीररीत्या जखमी झाले. त्यात परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. २०१३ मध्ये पुणे सत्र न्यायालयाने बेगला बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली.