शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

जर्मन पर्यटकाची जीपीएस यंत्रणा खामगावात चोरी

By admin | Published: January 22, 2016 1:19 AM

जर्मन पर्यटक जगभ्रमंतीसाठी मोटारबाईकने आला होता भारतात.

खामगाव (बुलडाणा): जगातील धोकादायक रस्त्यांवर विक्रमी वेळेत प्रवास करून चारवेळा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदविणारा र्जमन पर्यटक गॅरी मार्या उर्फ गॅहात याच्या मोटारबाईकवरील जीपीएस यंत्रणा खामगाव शहरातून २0 जानेवारी रोजी चोरी झाली. त्यामुळे विक्रमी वेळेत प्रवास करून आणखी एक विक्रम नोंदविण्याच्या त्याच्या प्रयत्नांना खिळ बसली आहे. कॅनडा, अमेरिका, तसेच दक्षीण अमेरिकेतील सर्वात घातक महामार्गावरून विक्रमी वेळेत प्रवास करणार्‍या गॅरी मार्या याने गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये चार विक्रम नोंदविले आहेत. जगभ्रमंतीसाठी निघालेला गॅरी चार चाकी मोटारबाईकने मुंबईहून कलकत्ताकडे जात असताना, राष्ट्रीय महामार्गावर खामगावनजीक त्याला मोहन तायडे नामक खामगाव येथील रहिवाशाने थांबविले. हा महामार्ग धोकादायक असून, वाहनाची वेग र्मयादा कमी ठेवण्याचा सल्ला तायडे यांनी गॅरीला दिला. या संवादातून दोघांची ओळख झाली. २0 जानेवारी रोजी गॅरी हा तायडे यांच्या संजीवनीनगरमधील निवासस्थानी मुक्कामी थांबला. त्यावेळी त्याला बघण्यासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेत, अज्ञात व्यक्तीने मोटारबाईकवरील जीपीएस यंत्रणा चोरून नेली. रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. गॅरीने मोहन तायडेसोबत खामगाव पोलिस स्टेशनला पोहोचून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी संजीवनीनगर भागात जाऊन घटनेची माहिती घेतली. गॅरीची जीपीएस यंत्रणा कुणाला सापडली असेल तर ती परत द्यावी, असे आवाहन पोलिसांनी उद्घोषकावर केले; मात्र त्याचा उपयोग झाला नाही. या घटनेची खामगाव पोलिसांनी नोंद केली; मात्र गॅरीने तक्रार दिली नसल्याने गुन्हा दाखल झाला नाही.टेस्ट पायलट म्हणून करतो कामपोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅरी र्जमनीत टेस्ट पायलट म्हणून काम करतो. त्याला पॅराग्लायडींगचा छंद आहे. हिमालयात सात हजार ७00 मीटर उंचीवर पॅराग्लायडींग करण्याचा त्याने प्रयत्न केला होता.