पुणे : शहरातील मुळा-मुठा नद्यांना आलेले गटारगंगेचे रूप पालटण्यासाठी महत्त्वाकांक्षी एक हजार कोटी रुपयांच्या नदी सुधारणा (जायका) प्रकल्पाला मंजुरी मिळून एक वर्ष उलटले, तरी अद्याप त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. केंद्र शासनाकडून या प्रकल्पासाठी सल्लागारांची नेमणूक केली जात नसल्याने त्याचे काम सुरू होऊ शकले नसल्याची माहिती उजेडात आली आहे.जायका प्रकल्पाला १३ जानेवारी २०१६ रोजी केंद्र शासनाची अंतिम मान्यता देण्यात आली. त्यानंतर १ वर्ष पूर्ण झाले, तरी या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी अनेक सल्लागार कंपन्यांनी प्रस्ताव सादर केले आहेत; मात्र नेमणुकीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. प्रकल्पाचा पहिला हिस्सा म्हणून केंद्राकडून ५ कोटी रुपयांची रक्कम पालिकेला अदा करण्यात आली आहे. मात्र, प्रकल्पाच्या सल्लागार नेमणुकीमध्ये चालढकल करण्यात येत आहे. जायका प्रकल्पाचे काम २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरात दररोज ७०० एमएलडी इतके सांडपाणी तयार होते, त्यापैकी बहुतांश सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न होता ते थेट नदीमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे नद्यांना नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर नद्यांना आलेले हे रूप बदलण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने मुळा-मुठा नद्यांचा सुधारणा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत शहरात तयार होणाऱ्या सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीमध्ये सोडले जाणार आहे. त्यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारणे, मलनिस्सारण वाहिन्या टाकणे आदी कामे केली जाणार आहे. एकूण ९९० कोटी रुपये इतका खर्च या प्रकल्पासाठी येणार आहे. त्यापैकी ८५ टक्के रक्कम केंद्र शासनाकडून पुणे महापालिकेला अनुदान म्हणून दिली जाईल, उर्वरित १५ टक्के रक्कम पालिकेला उभी करायची आहे. जपान सरकारच्या जायका संस्थेकडून या प्रकल्पासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा करार केल्याने हा प्रकल्प जायका प्रकल्प या नावाने ओळखला जात आहे.>जायका प्रकल्पांतर्गत नियोजित कामे बाणेर-बालेवाडीमध्ये ४३ किलोमीटरची जलवाहिनी टाकणे शहरात ७० किमीची मुख्य जलवाहिनी टाकणेमुंढवा मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारणेवडगाव व वारजे मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारणेतानाजीवाडी व धानोरी मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारणेसेंट्रल स्काडा सिस्टीम विकसित करणेशहरात विविध २४ ठिकाणी कम्युनिटी टॉयलेट बांधणे>दिल्लीमध्ये ७ मार्च रोजी बैठकजायका प्रकल्पाचा रखडलेल्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी ७ मार्च रोजी दिल्लीमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सल्लागार नेमणुकीचा तिढा सोडविला जाण्याची शक्यता आहे.
जायका प्रकल्पाला मिळेना सल्ला
By admin | Published: March 04, 2017 12:32 AM