धुळे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी आमदार रमेश कदम यांना अटक झाली. मात्र महामंडळाच्या अन्य दोषी पदाधिकाऱ्यांनाही अटक झाली पाहिजे, अशी मागणी माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली आहे.भविष्यात घोटाळा न होण्यासाठी महामंडळाच्या अध्यक्षपदी सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली. येथील समाजप्रबोधन संवाद यात्रेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. घोटाळा उघडकीस आणल्याबद्दल त्यांनी ‘लोकमत’चे विशेष अभिनंदन केले. आ. कदम यांना, तुमची मंत्री पदासाठी शिफारस झाली पाहिजे. ती आम्ही करू, असे सांगून अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून वाहनांसाठी कर्ज घेतले, असा आरोप ढोबळे यांनी केला. मला सुद्धा फॉर्च्यूनर गाडीची आॅफर होती, परंतु मी घेतली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
सर्व दोषींना अटक करा
By admin | Published: August 24, 2015 12:44 AM