शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

गद्दारांचे वस्त्रहरण करा : जाधव

By admin | Published: August 18, 2015 11:02 PM

राष्ट्रवादीचा चिंतन मेळावा : सुनील तटकरे म्हणाले... एलबीटी रद्द करा मात्र सामान्य माणसावर कर बसवला गेल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल.

रत्नागिरी : चिपळूणचा राजकीय धसका घेऊन पक्ष सोडला, असे जर उदय सामंत म्हणत असतील तर त्यांची भूमिका पूर्णत: चुकीची आहे. पक्षाने ज्यांना महत्त्वाची पदे, मंत्रीपद, पालकमंत्रीपद दिले त्याने आयत्यावेळी एबी फॉर्म घेऊनही पक्ष बदलला, स्वार्थासाठी विश्वासघात केला, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगावला, तर सर्व पदे भोगूनही विश्वासघात करणाऱ्या या नादान माणसाचे जाहीर सभा घेऊन राजकीय वस्त्रहरण केले पाहिजे, असा तिखट वार माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीच्या चिंतन मेळाव्यात केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या राज्यव्यापी संपर्क दौऱ्याला मंगळवारी रत्नागिरी येथून सुरूवात झाली. यानिमित्ताने साईमंगल कार्यालयात पक्षाचा जिल्हा चिंतन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री जाधव, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, राजाभाऊ लिमये, चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम, माजी मंत्री रवींद्र माने, राष्ट्रवादी प्रदेश युवकचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय कदम, बशीर मुर्तुझा, कुमार शेट्ये, संदेश कोंडविलकर, बाबाजी जाधव, अजय बिरवटकर आदी मान्यवर नेते उपस्थित होते. तटकरे यांनी या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर जळजळीत टीका केली. मोदी हे देशाच्या संसदेपेक्षा परदेशातच अधिक काळ असतात. पत्रकारांना परदेश दौऱ्यावर नेण्याचा व पारदर्शकता दाखवण्याचा पायंडा यांनी मोडला आहे. आपले भांडे फुटू नये म्हणून हे सारे घडते आहे. पेट्रोल, डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय क्रूड तेलाच्या सध्याच्या किमतीनुसार ३५ व २५ रुपये प्रतिलिटर असायला हवे होते, असे असतानाही ७० रुपयाने विकले जात आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या सेनेच्या कुवारबाव येथे काढलेल्या मोर्चात माणसेच दिसली नाहीत. येथे शिवसेनेचे वर्चस्व आहे, असे सांगणाऱ्या नेत्यांना या मोर्चात कार्यकर्ते, लोकांना का एकत्र आणता आले नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. एक काळ भाजपचे केंद्रीय नेते मुंबईत आले की मातोश्रीवर यायचेच. आज असे होत नाही. याचाच अर्थ शिवसेनेच्या हाती आता रिमोटच राहिलेला नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)तुम्हीच याला संपवा...भास्कर जाधवना बदला व उदय सामंतना मंत्रीपद द्या, पालकमंत्रीपद द्या, असा तगादा त्यावेळी लावणाऱ्यांनी हा विश्वासघात उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे. त्यावेळी बदलाची मागणी करणाऱ्यांना आता माझे सांगणे आहे की, त्यांनी हे पाप संपवले पाहिजे, असे भास्कर जाधव म्हणाले. तटकरे म्हणाले...एलबीटी रद्द करा मात्र सामान्य माणसावर कर बसवला गेल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल.कार्यकर्त्यांनी २०१६मधील पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक तयारीला लागावे.रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील संघटनेला बळ देण्यासाठी जाधवांनी कमान सांभाळावी.