नागपूर : विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या विजयात पक्ष संघटनेचा मोठा वाटा आहे. परंतु पुढील वर्षात महापालिकेच्या निवडणुकीचे आव्हान आहे. यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आतापासून सज्ज व्हावे, असे आवाहन भाजपचे शहर अध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे यांनी रविवारी केले. गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. भाजपच्या सहा मंडळ अध्यक्षांच्या नावांची घोषणा करण्यात आली.व्यासपीठावर महापौर प्रवीण दटके, माजी खासदार बनवारीलला पुरोहित , आमदार अनिल सोले,सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, गिरीश व्यास, डॉ. मिलिंद माने, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे,सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, प्रदेश मंत्री जमाल सिद्दीकी, राजेश बागडी, श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते. शहरातील १८८७ बुथप्रमुख, ७२ प्रभागात ८५ अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. राजकीय इतिहासात भाजप संघटनात्मक दृष्ट्या यशोशिखरावर पोहचला आहे. शहरात चार हजार सक्रिय कार्यकर्ते असून ७ लाख सभासद आहेत. प्रभाग अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविलेल्यांनी महापलिका निवडणुकीत उमेदवारीसााठी आग्रही धरू नये. त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे खोपडे यांनी स्पष्ट केले.अनेक नगरसेवकांना त्याच्या प्रभागाची माहिती नाही. कधीतरी प्रभागात दिसतात. पक्षात काम करणाऱ्यांनाच महत्त्व आहे. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीला एकजुटीने सामोरे जावे,असे आवाहन त्यांनी केले.नवीन कार्यकारिणीच्या नेतृत्वात महापालिकेच्या आगामी निवडणुकीला सामोरे जायचे आहे. यासाठी तयारीला लागा, असे आवाहन गिरीश व्यास यांनी केले. यावेळी सभापती गोपाल बोहरे, सुनील अग्रवाल, संदीप जाधव,गिरीश देशमुख, माजी महापौर अर्चना डेहनकर, जयप्रकाश गुप्ता, बाल्या बोरकर, प्रभाकर येवले, किर्तीदा अजमेरा यांच्यासह पदाधिकारी व कार्यक र्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेश बागडी यांनी संचालन केले. नवीन मंडळ अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले. (प्रतिनिधी)
महापालिका निवडणुकीसाठी सज्ज व्हा
By admin | Published: January 11, 2016 3:00 AM