विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी तुडुंब गर्दी केली होती. बहुतेक उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत मिरवणुकी काढून धूमधडाक्यात अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई शहरातील 1क् मतदारसंघांमधून सुमारे 198 उमेदवारांनी तर उपनगरांतून 472 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 1 ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असल्याने प्रत्यक्षात किती उमेदवार मैदानात राहतील, हे तेव्हाच स्पष्ट होणार आहे.
लोढांविरोधात अरुण दूधवडकर
दक्षिण मुंबईतील भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणा:या मलबार हिल मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या अरुण दूधवडकर यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आ. मंगलप्रभात लोढा यांच्यापुढील अडचणी वाढणार आहेत. राष्ट्रवादीकडून या ठिकाणाहून नरेंद्र राणो यांनी अर्ज दाखल केला आहे.
माहीममध्ये 9 उमेदवार रिंगणात
एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या माहीम मतदारसंघावर गेल्या निवडणुकीत मनसेने सेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी शिवसेनेने माजी आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. तर मनसेकडून नितीन सरदेसाई निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसकडून प्रवीण नाईक यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने ढोल-ताशांच्या गजरात शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. तर भाजपाकडून विलास आंबेकर आणि राष्ट्रवादीकडून वामन परब यांनी अर्ज भरले आहेत. या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. या मतदारसंघातून एकूण 9 उमेदवार रिंगणात आहेत.
ईशान्य मुंबईत बाहुबलींचे शक्तिप्रदर्शन
उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी ईशान्य मुंबईतल्या सहा विधानसभा मतदारसंघांतल्या बाहुबली उमेदवारांनी निवडणूक कार्यालयांबाहेर शक्तिप्रदर्शन केले. मुलुंड मतदारसंघातून काँग्रेस नेते चरणसिंग सप्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादीतर्फे संजय पाटील यांनी विक्रोळीतून, भाजपातर्फे राम कदम तर शिवसेनेतर्फे सुधीर मोरे यांनी घाटकोपर पश्चिममधून शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले.
36 मतदाररसंघात 67क् अजर्
शहरातील 1क् विधानसभा मतदारसंघांतून 2क् ते 27 सप्टेंबरदरम्यान विविध राजकीय पक्षांच्या एकूण 198 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात सर्वाधिक उमेदवार हे धारावी मतदारसंघात असून उमेदवारांची सर्वात कमी संख्या माहीम मतदारसंघात आहे. धारावीतून तब्बल 29 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून माहीम मतदारसंघात केवळ 9 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
सायन कोळीवाडय़ातही अपक्षांची गर्दी
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सायन कोळीवाडा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह अपक्षांनी गर्दी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद लाड हे मोठय़ा संख्येने कार्यकत्र्यासह निवडणूक कार्यालयात दाखल झाले. गुरुवारी काँग्रेसचे उमेदवार जगन्नाथ शेट्टी यांनी आपले शक्तिप्रदर्शन दाखवले असतानाच राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले लाड यांनी दाखवलेले शक्तिप्रदर्शन म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादीत अटीतटीचा सामना रंगणार हेच दिसून आले. त्यांच्यामागोमाग मनसेचे उमेदवार
बाबा कदमही कार्यकत्र्यासह दाखल झाले. तर त्यांच्यानंतर शिवसेनेचे उमेदवार मंगेश सातमकरही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले. या उमेदवारांनी आपले अर्ज भरल्यानंतर साधारण 2च्या सुमारास स्वाभिमानी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक मनोज संसारे आपल्या कार्यकत्र्यासह दाखल झाले. या वेळी त्यांच्यासोबत कार्यकत्र्याची मोठी फौज होती. हे पाहता संसारे निवडणुकीत अन्य पक्षांना भारी पडणार की काय अशी चर्चा रंगली. सायन कोळीवाडय़ातून एकूण
23 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. गुरुवारी 7 तर शुक्रवारी
16 अर्ज दाखल झाले.
धारावीत पंचरंगी लढत 29 उमेदवार रिंगणात
विधानसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेचे उमेदवार बाबूराव माने, भाजपाकडून दिव्या ढोले, राष्ट्रवादी गोविंदभाई परमार आणि मनसेकडून गणोश खाडे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रमुख उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अर्ज
भरले. या निवडणुकीत एकूण 29 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शुक्रवारी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला
आहे. उमेदवारांची संख्या अधिक असली तरी प्रमुख पाच उमेदवारांमध्ये पंचरंगी लढत होणार आहे. प्रत्येक उमेदवाराला आपल्या ताकदीवर निवडणुकीच्या आखाडय़ात सिद्ध करून दाखवावे लागणार आहे. शिवसेनेतील नाराजी दूर करण्यात पक्ष नेत्यांना यश आल्याने
शिवसेना जोमाने प्रचाराला लागली आहे. तर अपक्ष उमेदवारांनी
मोठय़ा संख्येने अर्ज दाखल केले असून, हे उमेदवार प्रमुख उमेदवारांची काही मते घेतील.
चेंबूरमध्ये 25 उमेदवारी अर्ज दाखल
प्रतिस्पर्धी उमेदवारांना आपली ताकद दाखवण्यासाठी आज शेवटच्या दिवशी विविध पक्षांच्या 25 उमेदवारांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. ऐन वेळेला पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झाल्यामुळे कागदपत्रंची पूर्तता करणो आणि कार्यकत्र्याना जमा करण्यासाठी मोठी धावपळ उडाली. त्यातच उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शिवाय 3 वाजेर्पयतच वेळ असल्याने अनेक उमेदवारांनी वाजतगाजत मिरवणूक काढण्याचे टाळले. काहींनी अर्ज दाखल केल्यानंतर मिरवणुका काढल्या. शिवसेनेतर्फे प्रकाश फातर्पेकर, राष्ट्रवादीतून रवींद्र पवार, बहुजन समाज पार्टीमधून राजाभाऊ सोनटक्के तर भाजपामधून अनिल ठाकूर व अनिल चौहान या दोघांनीदेखील अर्ज दाखल केले आहेत.
शिवडीत नांदगावकरांविरोधात सेनेचे अजय चौधरी
उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शिवडी मतदारसंघात एकूण 8 उमेदवारांनी अर्ज दाखल केला. त्यात शिवसेनेचे अजय चौधरी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकर यांनी मिरवणूक काढत कार्यकत्र्याच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय, काँग्रेसकडून मनोज जामसुतकर, भाजपाकडून शलाका साळवी यांनीही अर्ज दाखल केला आहे. तसेच, या मतदारसंघातून बहुजन समाज पार्टीमधून विजय जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कुलाब्यात काँग्रेसविरोधात राष्ट्रवादी
कुलाबा मतदारसंघातून शनिवारी काँग्रेसच्या स्थानिक आमदार अॅनी शेखर यांनी तुरळक कार्यकत्र्याच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी राष्ट्रवादीच्या बशीर मुसा पटेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अरविंद गावडे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या राज पुरोहित आणि शिवसेनेच्या पांडुरंग सपकाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मुंबादेवीतून 5 मुख्य उमेदवारांचे अजर्
मुंबादेवी मतदारसंघातून आज पाच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात शिवसेनेच्या वसुंधरा सालेकर, भारतीय जनता पक्षाचे अतुल शहा, काँग्रेसचे आमदार अमिन पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे हुजैफा ईस्माईल इलेक्ट्रीकवाला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इम्तियाज अनिस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, अर्ज दाखल करून बाहेर पडताना अतुल शहा यांची भेट काँग्रेसचे मुंबादेवीचे विद्यमान आमदार अमिन पटेल यांच्यासोबत झाली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होते की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र दोघांनीही एकमेकांना हसत-हसत आलिंगन देत, निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. तर सुप्रसिद्ध गायक दिवंगत मोहम्मद रफी यांचे ज्येष्ठ पुत्र शाहिद मोहम्मद रफी यांनीही ओवेसी बंधूंच्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दिंडोशी,
गोरेगावात घमासान
माजी महापौर शिवसेनेचे सुनील प्रभू, राष्ट्रवादीचे अजित रावराणो, मनसेच्या शालिनी ठाकरे आणि भाजपाचे मोहित कंबोज यांनी शुक्रवारीच उमेदवारी अर्ज भरला़ दिंडोशी मतदारसंघातील विद्यमान आमदार काँग्रेसचे राजहंस सिंह यांनी कार्यकत्र्याच्या फौजफाटय़ासह उमेदवारी अर्ज दाखल केला़ गोरेगाव विधानसभा मतदारसंघातही पंचरंगी लढत होणार आह़े येथून सेनेच्या सुभाष देसाई यांची उमेदवारी निश्चित असल्याने त्यांनी आधीच अर्ज भरला होता़ तर त्यांच्याविरोधात भाजपाच्या विद्या ठाकूर यांनी अर्ज भरला आह़े
योगेश सागर
विरुद्ध शुभदा गुडेकर
फॉर्म भरायचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी धावपळ व गर्दी दिसून आली. भाजपाचे विद्यमान आमदार योगेश सागर वगळता इतर सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी अर्ज भरल्याने चारकोप विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाच्या परिसरात घोषणाबाजी, ढोल-ताशांचा गजर असे वातावरण होते. राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कोंडविलकर यांनी अर्ज भरल्यानंतर शिवसेनेच्या शुभदा गुडेकर, काँग्रेसचे भरत पारेख आणि मनसेचे दीपक देसाई यांनी उमेदवारी अर्ज भरले. या वेळी सेना व मनसेच्या कार्यकत्र्यानी शक्तिप्रदर्शन करताना परिसर ढोल-ताशे व पक्षप्रमुखांच्या घोषणोने गाजवला.
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील 25 मतदारसंघांतून एकूण 472 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात कलिना मतदारसंघातून सर्वाधिक 31 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून सर्वात कमी म्हणजेच 11 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
मतदारसंघअजर्
बोरीवली13
दहिसर16
मागाठाणो17
मुलुंड12
विक्रोळी19
भांडुप2क्
जोगेश्वरी पूर्व11
दिंडोशी18
कांदिवली16
चारकोप17
मालाड पश्चिम16
गोरेगाव2क्
वर्सोवा24
अंधेरी (पश्चिम)17
अंधेरी (पूर्व)15
विलेपार्ले13
चांदिवली23
घाटकोपर(पश्चिम)27
घाटकोपर (पूर्व)18
अणुशक्ती नगर21
चेंबूर18
कुर्ला27
कलिना31
वांद्रे (पूर्व)25
वांद्रे (पश्चिम)18