मुंबई : कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना योद्धांचा मान दिला गेला आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या राज्य सरकारच्या कर्मचारी, मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना एसटीच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. ही सुविधा गुरुवारपासून बंद करण्याचे एसटीने आदेश दिले होते. मात्र मुंबई महानगरपालिकेने त्याला मुदतवाढ दिली आहे.
लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी बस आपली सेवा देत आहे. या कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी एसटीच्या विशेष फेऱ्या मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून चालविण्यात येत आहेत. दरम्यान, यामधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून कामावर जात असल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना मोफत प्रवास देण्याची मागणी केली होती.
त्यानुसार महानगरपालिका आणि राज्य शासनाने एसटी महामंडळाला आगाऊ रक्कम अदा केली होती. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या प्रवासामध्ये तिकीट आकारण्यात येऊ नये, अशा सुचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणेच वाहकांकडून या कर्मचाऱ्यांना तिकीट देऊन तिकीटच्या मागे त्याची संपूर्ण माहिती लिहून घेतली जात होती. मात्र ही सुविधा गुरुवार पासून बंद करण्याचा निर्णय एसटीने घेतला होता. परंतु, महानगरपालिकेने याला मुदतवाढ दिली आहे.
मुंबई महानगरपालिकेने एसटीमध्ये महापालिका कर्मचार्यांनासाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. ती सुविधा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मोफत प्रवास मिळणार आहे.- राहुल तोरो, महाव्यवस्थापक, एसटी वाहतूक
एसटीचे दुसऱ्यांदा परिपत्रक रद्दअत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटीतून मोफत प्रवास बंद अशा आशयाचे परिपत्रक एसटीने दुसऱ्यांदा रद्द केले आहे. राज्य सरकारकडून परिपूर्तीची रक्कम एसटीला मिळणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील मुंबई महापालिका कर्मचारी, मंत्रालय कर्मचारी, पोलीस, शासकीय कर्मचारी यांचा प्रवास मोफत सुरू राहणार आहे.
आणखी बातम्या...
जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात 5 मुलं बुडाली
टिकटॉक बंदीवरून TMC खासदार नुसरत जहाँ यांचा मोदी सरकारला सवाल, म्हणाल्या...
'या' राज्यात 1088 अत्याधुनिक रुग्णवाहिका सुरू; अवघ्या काही मिनिटांत लोकांपर्यंत पोहोचतील
TikTok सारखं भारतीय Moj अॅप; अवघ्या दोन दिवसांत हजारो युजर्स