पुणो : तत्काळ पासपोर्टच्या अपॉइटमेंट मिळत नसल्याने तातडीने परदेश दौ:यावर जाण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या. या पाश्र्वभूमीवर तत्काळ पासपोर्टच्या अपॉइंटमेंटमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. येत्या 22 सप्टेंबरपासून त्यामध्ये टप्प्या-टप्प्याने वाढ केली जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी दिली.
तत्काळ पासपोर्टच्या अपॉइंटमेंटकरिता पुणो शहरासाठी परराष्ट्र मंत्रलयाकडून 11क् ची मर्यादा ठरवून देण्यात आली होती. पुणो विभागामध्ये तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज करणा:यांची संख्या मोठी असल्याने पासपोर्ट अर्जदारांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत होता. या पाश्र्वभूमीवर गोतसुर्वे यांनी सातत्याने परराष्ट्र विभागाकडे पाठपुरावा करून, त्यामध्ये वाढ करून घेतली आहे.
पुणो पासपोर्ट विभागामध्ये पुणो, सातारा, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर व सोलापूर या 6 जिल्ह्यांचा समावेश होतो. पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर कागदपत्रंच्या पडताळणीसाठी अर्जदारांना वेळ दिली जाते. साधारणत : दररोज 8क्क् ते 9क्क् अपॉइंटमेंट अर्जदारांना दिल्या जातात, त्यापैकी 11क् अपॉइंटमेंट या तत्काळसाठी दिल्या जात होत्या. पासपोर्टसाठी अर्ज करणा:यांची संख्या मोठी असल्याने तत्काळ पासपोर्टसाठी अपॉइंटमेंटच मिळत नसल्याच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात येत होत्या.
पासपोर्टसाठी अर्ज केल्यास कागदपत्र पडताळणीसाठी दीड ते दोन महिन्यांनंतरची अपॉइंटमेंट मिळते, त्याचवेळी तत्काळसाठी अर्ज केला असता, आठवडय़ाच्या आत कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविले जाते. तत्काळसाठी
अर्ज केल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पासपोर्ट वितरित केल्यानंतर
पार पाडली जाते. त्यामुळे अर्ज केल्यापासून 8 दिवसांच्या आत अर्जदाराला पासपोर्ट
मिळतो. (प्रतिनिधी)
अतिमहत्त्वाच्या कामासाठी ‘तत्काळ’चा वापर व्हावा
तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज करताना गॅझेट ऑफिसरचे शिफारस पत्र जोडणो बंधनकारक आहे. काही वरिष्ठ अधिका:यांकडून अनेक पासपोर्ट अर्जधारकांना तत्काळसाठी आवश्यक असणारी शिफारस पत्रे वारंवार दिली जात होती. पासपोर्ट कार्यालयाकडून अशा अधिका:यांची यादी तयार करून, अशा पद्धतीने कोणतीही शहानिशा न करता, शिफारस पत्रे देऊ नयेत, अशी सूचना त्यांना करण्यात आली आहे. अति महत्त्वाच्या कामासाठी परदेशात जायचे असेल, तरच तत्काळमधून अर्ज करावा. पर्यटन, मौजमजेच्या वारीसाठी तत्काळमधून अर्ज करू नयेत, असे आवाहन पासपोर्ट विभागाकडून करण्यात आले आहे.