शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

सुरुंच्या बागा केल्या बकाल

By admin | Published: November 04, 2016 3:11 AM

मागील आठवडाभर दिवाळीनिमित्त डहाणू आणि बोर्डीतील समुद्रकिनारा आणि सुरूंच्या बागा पर्यटकांनी गजबजल्या होत्या.

अनिरुद्ध पाटील,

डहाणू/बोर्डी- मागील आठवडाभर दिवाळीनिमित्त डहाणू आणि बोर्डीतील समुद्रकिनारा आणि सुरूंच्या बागा पर्यटकांनी गजबजल्या होत्या. दरम्यान काही अविवेकी पर्यटकांच्या वर्तणूकीने सुरू बागा बकाल बनल्या आहेत. पर्यटकांच्या गैरवर्तणूकीला आळा घालण्यात वन विभाग अपयशी ठरल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. दिवाळीनिमित्त डहाणू आणि बोर्डी परिसरात मोठ्या प्रमाणात परगावातील पर्यटक दाखल झाले होते. या पर्यटन स्थळी बोटिंग, पॅराग्लायिडंग, बनाना रायडिंग आदि. सुविधा उपलब्ध नाहीत. मात्र निसर्गाने मुक्त उधळण केल्याने मागील आठवड्यापासून पर्यटकांचा ओघ वाढता होता. या वेळी पर्यटकांनी समुद्री पर्यटनासह हिरव्या गार सुरू बनात निसर्गाचा मनमुराद आस्वाद लुटला. मात्र काही अविवेकी पर्यटकांनी सुरू बागांमध्ये चूल पेटवून अन्न पदार्थ शिजवले, खाद्य पदार्थांचे अवशेष, प्लॅस्टिक पिशव्या, मद्याच्या बाटल्या उघड्यावर फेकल्याने अस्वच्छता पसरली आहे. शिवाय मद्याच्या रिकाम्या बाटल्या झाडांच्या बुंद्यांवर आदळून फोडल्याने सर्वत्र काचांचे तुकडे पसरल्याने चालणेही धोकादायक बनले आहे. चुलीसाठी जाळ म्हणून बागेतील लाकडे वापरल्याने झाडांना इजा पोहचली आहे. एकंदरीत सुरू बागांना बकाल स्वरूप येऊन जैवविविधतेला धोका पोहचतो आहे. >नागरीकांनी केलेल्या वनीकरणाचा सत्यानाश?नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून समुद्रकिनारी ताड बियांचे रोपण करून हरीतपट्टा वाढविण्यास मोलाचे योगदान दिले आहे. मात्र पर्यटन विकासाच्या नावाखाली खेळणी, बैठक व्यवस्था, अनधिकृत विद्युत रोषणाई आणि पेव्हर ब्लॉकचा जॉगिंग ट्रक उभारण्याचा घाट वन विभागाने घातला आहे. राज्याचे वनमंत्री नागरिकांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन करतात आणि दुसऱ्या बाजूला स्थानिकांनी संवर्धनाने वाढवलेली वनसंपदा नष्ट करण्याचा घाट डहाणू वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घालीत आहेत. त्यामुळे वनमंत्र्या प्रमाणेच डहाणू पर्यावरण प्राधिकरणाला लिखित निवेदन दिले जाणार आहे. सुरुंच्या बागांना हानी पोहचू देणार नाही. प्रशासनाने दखल न घेतल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबिण्यात येईल.’’ - कुंदन राऊत (पर्यावरणप्रेमी, डहाणू)