शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

घुग्गुस ठरले महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित ठिकाण; सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 6:11 AM

प्रदूषणामुळे स्थानिक अनेक आजारांच्या विळख्यात

- आशिष राॅय  नागपूर : एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (टेरी)च्या २०१८-१९च्या अहवालानुसार चंद्रपूरजवळील घुग्गुस हे महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित ठिकाण असल्याचे आढळून आले आहे. या अहवालानंतर सरकारला उपाययोजना करण्यासाठी जाग येईल, असे वाटले; परंतु स्थानिकांची घोर निराशा झाली. वायू प्रदूषणामुळे लाेक माशांसारखे मरत असताना जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी गाढ झोपेत आहेत.  टेरीच्या अहवालानुसार रिस्पायबल सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर (आरएसपीएम)ची सरासरी पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्धारित केलेल्या कमाल मर्यादेच्या तिप्पट आहे. ६० मायक्राेग्रॅम/ घनमीटर या मर्यादेच्या तुलनेत २०१८-१९ मध्ये ते १७५ म्युग्रॅम्/ घनमीटर एवढे हाेते. २०१७-१८ मध्ये ते २९८ म्युग्रॅम/ घनमीटरपर्यंत वाढले हाेते. आरएसपीएमच्या उच्च पातळीमुळे घुग्गुसचे रहिवासी हृदयविकाराच्या झटक्याने मरत आहेत. बहुतेकांना किडनी, स्तन, फुप्फुस, हृदय, डोळे आणि त्वचेच्या आजारांनी ग्रासले आहे. उदरनिर्वाहासाठी शहरात राहण्यास भाग पडलेल्या अनेकांनी आपली कुटुंबे नागपूर किंवा इतर ठिकाणी स्थलांतरित केली असल्याचे आम आदमी पक्षाचे नेते अमित बोरकर यांनी सांगितले.  घुग्गुसचे डॉ. प्रदीप यादव यांच्या मते, शहरात त्वचेची ॲलर्जी, दमा आणि हृदयाचे आजार भयंकर वाढले आहेत. येथे सेट्रिझीन या अँटी-एलर्जिक औषधाची विक्री खूप जास्त आहे. घुग्गुसमध्ये स्पंज आयर्न, सिमेंट आणि कोळसा यांचा घातक संयोग आहे. लॉयड्स मेटलचा स्पंज आयर्न प्लांट, एसीसीचा सिमेंट प्लांट आणि डब्ल्यूसीएलच्या कोळशाच्या खाणी शहराजवळ आहेत. स्पंज आयर्न प्लांट्स हे सर्वात प्रदूषित उद्योगांपैकी एक असून, अनेक देश आणि भारतीय राज्यांनी त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत. घुग्गुसमध्ये मात्र हे उद्याेग हवेत मुक्तपणे विष टाकत आहेत.  गेल्या ३० वर्षांपासून प्रदूषणाविरुद्ध लढा देणारे पर्यावरण कार्यकर्ते विनेश कलवाल यांनी सांगितले की, लॉयड्स प्लांटमधून लोहाचे बारीक कण हवेत उत्सर्जित हाेतात व मानवी फुप्फुसात स्थिरावत रक्तप्रवाहात प्रवेश करतात. तिशीतले तरुण हृदयविकाराच्या आजाराने ग्रस्त झाले आहेत, तर २० वर्षांच्या तरुणांना कर्करोग होत आहे. घुग्गुसमधील प्रत्येक तिसऱ्या घरात कर्करोगाचा रुग्ण असून, लवकरच प्रत्येक घरात एक रुग्ण असेल. प्रदूषणाचे परिणामनायट्राेजन ऑक्साईड श्वसन प्रणालीवर परिणामवनस्पतींच्या वाढीला अडथळाआम्ल वर्षा जलस्त्रोतांचे प्रदूषण सल्फर डायऑक्साईडश्वसनाचे आजारडाेळ्यांची जळजळवनस्पतींवर परिणामआरएसपीएमअवेळी मृत्यूश्वसनाचे तीव्र आजारवनस्पतींच्या वाढीवर परिणाम२०१८-१९ मध्ये प्रदूषणाचा स्तर                         एसओटू    एनओएक्स   आरएसपीएममर्यादा                  ५०           ४०             ६०घुग्गुसमध्ये स्तर        ४             २९           १७५