शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

गुलाम अली खान डेंग्यू कलाकार - गायक अभिजीतची जीभ घसरली

By admin | Published: October 09, 2015 9:25 AM

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्यने गुलाम अलींना ' दहशतवादी देशातील डेंग्यू कलाकार' म्हणत त्यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - ज्येष्ठ गझलगायक गुलाम अली खान यांचा पुणे, मुंबईतील कार्यक्रम रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला वाद आता आणखीनच चिघळला असून बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्यने गुलाम अलींना ' डेंग्यू कलाकार' म्हणत त्यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली. ' गुलाम अली यांचा शो रद्द झाला. कितीही वेळा हाकललं तरी या निर्लज्ज लोकांना आत्मसन्मानच नाही,  ना (त्यांच्याकडे) कोणतही काम. त्यांच्याकडे फक्त 'दहशतवाद' आहे. प्रेस्टिट्यूट'प्रमाणे आपण त्यांनाही पोसत आहोत, ' असे  शेलक्या शब्दांतील  ट्विट त्याने केले आहे.  
इतकचं नव्हे तर त्याने ट्विटरवरून मीडिया व राजकीय पक्षांवरही टीका केली आहे. 'आपले राजकीय पक्ष फक्त भुंकत असतात. हे कव्वाल त्यांच्या पात्रतेमुळे नव्हे पाकिस्तानी दलाल व प्रेस्टिट्यूटमुळे इथे येतात. कथित हिंदू राजकीय नेते व पक्ष फक्त बोलबच्चन असून ते फायद्यासाठी आरडाओरड करतात, पण दहशतवादी देशांमधून आलेल्या अशा डेंग्यू कलाकारांविरोधात ते कोणतीच कारवाई करत नाहीत' अशा खालच्या पातळीवरील शब्दांत टीका करत अभिजीतने मुक्ताफळे उधळली आहेत.
दरम्यान गुलाम अलींच्या कॉन्सर्टला विरोध करून तो रद्द करण्याच्या भूमिकेचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी समर्थन केले आहे. ज्या पाकिस्तानमुळे आपले जवान शहीद होतात, त्या देशाला आचमा विरोध आहे, कलाकारांना नव्हे. आम्ही जे केले ते आमचे राष्ट्रीय कर्तव्य होते, असे करून आम्ही शहीदांना खरी श्रद्धांजली वाहिल्याचे उद्धव यांनी म्हटले आहे.