शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
2
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
3
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
4
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
5
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
6
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
7
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
8
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
9
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
10
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
11
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
12
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
13
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
14
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
15
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
16
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
17
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
18
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
20
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान

२० कोटींचे नुकसान थांबविणाऱ्या तीन आयएएस अधिका-यांना बदल्यांची भेट

By अतुल कुलकर्णी | Published: November 22, 2018 2:02 AM

शासनाचे २० कोटी रुपयांचे नुकसान थांबवणा-या एमटीडीसीच्या तीन आयएएस अधिका-यांना खुलासे करण्याची नोटीस आणि बदलीची भेट मिळाली आहे. पण ज्या अधिका-याने हे सगळे केले त्यांच्या चौकशीच्या फाईलला कोणी हात लावण्यास तयार नाही.

मुंबई : शासनाचे २० कोटी रुपयांचे नुकसान थांबवणा-या एमटीडीसीच्या तीन आयएएस अधिका-यांना खुलासे करण्याची नोटीस आणि बदलीची भेट मिळाली आहे. पण ज्या अधिका-याने हे सगळे केले त्यांच्या चौकशीच्या फाईलला कोणी हात लावण्यास तयार नाही. एका अधिका-याला वाचविण्यासाठी काय केले गेले याची ही सुरस कथा आहे.एमटीडीसीने मुंबई मेला शॉपिंग फेस्टीव्हलच्या आयोजनासाठी १ वर्षाकरिता निविदा काढल्या होत्या. त्यात ओकस् मॅनेजमेंट प्रा. लि. यांची निविदा सर्वात कमी दराची निघाली. ज्यांच्या कालावधीत निविदा निघाल्या ते एमटीडीसीचे एमडी विजय वाघमारे काही दिवस रजेवर गेले. त्याच काळात जॉर्इंट एमडी आशुतोष राठोड यांनी सदर कंपनीसोबत करार करताना कामाचा कार्यकाळ १ वरुन ५ वर्षे केला. एकदा निविदा अंतीम झाल्यानंतर आर्थिक भार वाढविणारे कोणतेही फेरबदल त्यात करता येत नाहीत, अशा केंद्रीय दक्षता आयोगाच्या सूचना असताना हा बदल केला गेला. त्यामुळे एमटीडीसीवर २० कोटींचा बोझा पडला. शिवाय मुदतवाढ देताना ६ व्या वर्षी देखील निविदा काढल्यानंतर जी कंपनी सर्वात कमी दराची येईल त्यांच्याच दराने जर ओक्स कंपनी काम करायला तयार असेल तर त्यांनाच पहिले प्राधान्य दिले जाईल, अशी अजब अटही त्यात टाकली गेली.एमटीडीसीच्या मुख्य लेखाधिकाºयांनी असे बदल करण्यास विरोध केला पण त्यांचेही आक्षेप बाजूला ठेवून राठोड यांनी हा निर्णय घेतला. रजेवरुन आल्यानंतर वाघमारे यांनी या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले त्याला पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी स्थगिती देत सचिव विजयकुमार गौतम यांना चौकशीचे आदेश दिले. दरम्यान एमटीडीसीचे एमडी वाघमारे यांची बदली झाली व तात्पुरता पदभार सुहास दिवसे यांच्याकडे दिला गेला.सचिव गौतम यांनी दिवसे यांच्याकडे अहवाल मागितला तेव्हा त्यांनीही यात गंभीर अनियमितता झाल्या असून तपासाची व कारवाईची गरज असल्याचा अहवाल दिला. शिवाय दिवसे यांनी ओक कंपनीलाही कारणे दाखवा नोटीस दिली. दिवसे यांच्या नोटीसीच्या विरोधात ओक कंपनीने मंत्री रावल यांच्याकडे तक्रार केली, तेव्हा दिवसे यांच्या नोटीसीलाही मंत्री कार्यालयाने स्थगिती दिली. शिवाय मंत्र्यांच्या खाजगी सचिवांनी दिवसे यांना ईमेल पाठवून तुमच्याकडे तात्पुरता पदभार असताना तुम्ही असे निर्णय घेऊ नका असे कळवले. त्यावर दिवसे यांनी काय घडले त्याचे पत्र लिहून अशा वातावरणात आपल्याला काम करणे शक्य नाही, असेही कळवून टाकले.तो मेल येण्याआधी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असणाºया एमटीडीसीच्या बोर्ड मिटींगमध्ये ओक यांच्या कंपनीची निविदा रद्द करण्याचा निर्णय झाला होता व त्याचे मिनिट्सही तयार झाले होते हे विशेष. त्यानंतर दिवसे यांचीही बदली झाली. पुढे दिवसे यांच्या अहवालावर सचिव गौतम यांनी राठोड यांच्यावर कारवाईची शिफारस करत फाईल सामान्य प्रशासन विभागात पाठवली आणि गौतम यांचीच बदली करण्यात आली.बदली हवी, त्यांनी पाठपुरावा करावा!एका घटनेत गौतम, वाघमारे व दिवसे या तीन आयएएस अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आणि राठोड यांच्या चौकशीची फाइल सामान्य प्रशासन विभागात पडून आहे. ज्यांना बदली हवी. त्यांनी त्या फाइलचा पाठपुरावा करावा, असे आता एमटीडीसीमध्ये बोलले जात आहे.पात्र नसताना पद : जॉर्इंट एमडी आशुतोष राठोड हे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी आहेत. ते या पदासाठी पात्र नसताना त्यांना हे पद दिले गेले आहे हे विशेष!

टॅग्स :Transferबदली