नागपूर-
राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज रखडलेले प्रस्ताव, मंत्रिमंडळ विस्तार आणि मविआच्या योजनांना दिलेल्या स्थगितीवरुन सरकारला घेरलं. यावेळी अजित पवार यांनी आपल्या हटके स्टाइलनं सत्ताधारी मंत्र्यांवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर साडेचार वर्षे मुख्यमंत्री राहायचं आणि नंतरच्या सहा महिन्यात वेगळा विदर्भ करायचा असं त्यांच्या मनात होतं आता ते कितीही नाही म्हटलं तरी त्यांच्या मनात होतं, असं अजित पवार सभागृहात म्हणाले. ते पटवून देत असताना अजित पवार यांनी तूफान फटकेबाजी केली.
"आता मी अमृता वहिनींनाच सांगणार आहे बघा जरा...", अजित पवार यांचा फडणवीसांना चिमटा
अजित पवार यांनी महाराष्ट्रातील मंत्री पदावरून शिंदे-फडवणीस सरकारवर हल्लाबोल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी असल्याच्या मुद्द्यावरुन टीका केली. "सरकारला पालकमंत्री मिळत नाहीत हे फार दुर्दैवी आहे. आता उपमुख्यमंत्री फडणवीसांकडेच सहा खात्यांची जबाबदारी आहे. बरं ते टॅलेंटेड आहेत यात शंका नाही. पण तुमच्याकडे कुणी मंत्रीपद देण्यासाठी नेते नाहीत का? पक्षातील महिला नेत्यांना तरी संधी द्या आणि पालकमंत्रीपद द्या जेणेकरुन महिलांवर अन्याय होणार नाही", असं अजित पवार म्हणाले.
मोदींबाबत आक्षेपार्ह विधान, CM शिंदे तातडीनं उठले अन् झापलं; मिटकरींनी व्यक्त केली दिलगिरी
मुख्यमंत्री पद हे राज्यातील सर्व विभागाला मिळाले आहे, पण उत्तर महाराष्ट्राला आजवर मिळालेलं नाही अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली. त्यावेळी इतर सदस्यांनी गिरीश महाजन यांचं नाव घेण्यास सुरुवात केली. मग अजित दादांनी आपल्या स्टाइलनं गिरीष महाजन यांची फिरकी घेतली. "गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री पद नाही तर मोठी जबाबदारी द्यायची ठरलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पक्ष वाढवण्यासाठी त्यांना जबाबदारी दिली जाणार आहे, त्यांचा संपर्क तसा आहे. युनायटेड नेशनची जबाबदारी महाजन यांना देऊ", असं म्हणत अजित पवार यांनी तूफान फटकेबाजी केली. अजित पवार यांनी यावेळी गिरीश महाजन यांचे चांगले कॉन्टॅक्ट आहेते ते झटपट लोकांना कॉन्टॅक्ट करतात असं म्हटलं आणि सभागृहात एकच हशा पिकला.
...तर त्यांचा मीच करेक्ट कार्यक्रम करेनअजित पवार यांनी भाजपाच्या नेत्यांना यावेळी बारामती विधानसभा मतदार संघात येऊन केल्या जाणाऱ्या विधानांवरुनही लक्ष्य केलं. "बारामतीत येऊन काहीजण करेक्ट कार्यक्रम करण्याच्या वल्गना करतात. पण मी एक सांगतो जर मी मनात आणलं तर जे वल्गना करताहेत त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल", असं अजित पवार म्हणाले.
दोष नसताना तुरुंगात टाकता, मोगलाई आहे का?राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सुटका झाल्याच्या मुद्द्यावरुनही अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. "दोष नसतानाही तपास संस्थांकडून नेत्यांना तुरुंगात टाकलं जातं. काहीच सिद्ध होत नसताना तुरुंगात जाणं किती योग्य आहे? दोष नसताना तुरुंगांत टाकता ही काय मोगलाई आहे का?", असा सवाल करत अजित पवार यांनी उपस्थित केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"