शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

तिकीट कापल्याचे संकेत, खडसेंच्या उमेदवारीबाबत गिरीश महाजन म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 9:02 PM

तसेच लेवा पाटीदार समाजाचा आग्रह असून नाथाभाऊंना तिकीट न दिल्यास समाज नाराज होईल ?

मुंबई - मी उद्या उमेदवारी अर्ज भरतोय, परवा शेवटची तारीख आहे. त्यानंतर माझ्या मतदारसंघासह महाराष्ट्रात मी प्रचारासाठी जाणार आहे. मुक्ताईनगर मतदारसंघाबद्दल मला माहिती नाही, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीचे आमचे नेतेच याबाबत निर्णय घेतील. पक्ष याबाबत योग्य तो निर्णय घेईल आणि नाथाभाऊ जे नाव सूचवतील ते असू शकतं, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं. त्यामुळे भाजपाच्या यादीचीच प्रतीक्षा आता महाराष्ट्राला लागली आहे. 

भारतीय जनता पक्षाला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या साथीने राज्यात वाढविण्याच काम भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलं. गेल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत एकनाथ खडसेंनी पक्षाचं काम निष्ठेनं केलं. प्रामाणिकपणे जबाबदारीही पार पाडली. पण, 2019 च्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिलं आहे. याबाबत गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, नाथाभाऊ सूचवतील त्या कुणाचंही नाव असू शकतं, असे म्हणत कदाचित एकनाथ खडसेंचं नाव भाजपाच्या दुसऱ्या यादीत नसल्याचे संकेतच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत.

तसेच लेवा पाटीदार समाजाचा आग्रह असून नाथाभाऊंना तिकीट न दिल्यास समाज नाराज होईल ? याबाबतचा प्रश्न विचारल्यानंतर, प्रत्येक निर्णयाने कुणी ना कुणी नाराज होतच असतो. उद्या मला तिकीट न मिळाल्यास माझा समाजही नाराज होईल, कुणाच्याही समाजाला नाराज वाटणारचं, असे म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना उमेदवारी नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने 125 जणांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये विनोद तावडे, चंद्रकांत बावनकुळे, एकनाथ खडसे यांच्यासारख्या दिग्गजांचे नाव पहिल्या यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यातच मुक्ताई नगर मतदारसंघातून भाजपा नेते एकनाथ खडसेंनी यादीत नाव घोषित होण्यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, एकनाथ खडसेंचे नाव दुसऱ्या यादीतही नसल्याची माहिती पुढे येत आहे. 

मुक्ताईनगर मतदारसंघातून एकनाथ खडसे प्रतिनिधित्व करतात. 2014 मध्ये भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांना महसूल मंत्रीपद देण्यात आलं होतं. मात्र जमीन घोटाळ्याच्या आरोपावरुन एकनाथ खडसेंना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. तेव्हापासून एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळापासून दूर ठेवलं जात आहे. अशातच यंदाच्या निवडणुकीच्या पहिल्या यादीत एकनाथ खडसेंचे नाव नसल्याने खडसेंना उमेदवारी मिळणार का? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या यादीतही एकनाथ खडसेंचं नाव नाही, खडसेंऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून तिकीट देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या खडसेंना पुन्हा एकदा पक्षाने डावललं असल्याचं बोललं जातं आहे.  

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनEknath Khadaseएकनाथ खडसेJalgaonजळगावmuktainagar-acमुक्ताईनगरBJPभाजपा