शहरं
Join us  
Trending Stories
1
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
2
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
3
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
4
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
5
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
6
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
7
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
8
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
9
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
11
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
12
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
13
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
14
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
15
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
16
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
17
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
18
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
19
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
20
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'

मालमत्तेच्या वादातून जन्मदात्रीविरोधात मुलीने केला पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 5:10 PM

नाशिक : मालमत्तेच्या कारणावरून जन्मदात्या आईने मुलीसोबत वाद घालून घराच्या मुख्य दरवाजाची कडी लावून घेत मालमत्तेच्या कागदपत्रावर सह्या न केल्यास बघून घेण्याची धमकी दिल्याची फिर्याद मुलीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे़सरकारवाडा पोलीस ठाण्यात अंधेरी येथील डॉ़तरणजीत कौर चढ्ढा (३१, राफ़्लॅट नंबर ३, सुखसागर सोसायटी, अंधेरी ईस्ट) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ९ ...

ठळक मुद्देमालमत्तेच्या कागदपत्रावर सह्या करण्यास नकारसरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : मालमत्तेच्या कारणावरून जन्मदात्या आईने मुलीसोबत वाद घालून घराच्या मुख्य दरवाजाची कडी लावून घेत मालमत्तेच्या कागदपत्रावर सह्या न केल्यास बघून घेण्याची धमकी दिल्याची फिर्याद मुलीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे़सरकारवाडा पोलीस ठाण्यात अंधेरी येथील डॉ़तरणजीत कौर चढ्ढा (३१, राफ़्लॅट नंबर ३, सुखसागर सोसायटी, अंधेरी ईस्ट) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ९ नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी सव्वातीन वाजता आपली मुलगी विवियाना व सासू हरविंदर कौर चढ्ढा यांच्यासह शहरातील टिळकवाडीतील आई-वडीलांच्या घरी आल्या होत्या़ यावेळी घरी असलेली आई मनजित कौर मैनी यांनी दरवाजा उघडला व मुलगी डॉ़तरणजित कौर यांच्यासोबत मालमत्तेच्या कारणावरून वाद घालण्यास सुरूवात केली़ घराच्या मुख्य दरवाजाची कडी लावून घेत डॉ़ कौर यांना घरातून बाहेर जाण्यास रोखले तर मनजीत कौर मैनीयांनी घरातील रुममध्ये जाऊन मालमत्तेची कागदपत्रे आणून मुलीला सह्या करण्यास सांगितले़ मुलीने यास नकार देताच राग आलेल्या मनजीत कौर यांनी मुलीला बघून घेण्याची धमकी दिली़या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित मनजीत कौर मैनी (रा़प्लॉट नंबर २४१, सरदार बंगला, टिळकवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे़मिळकतीचा वादडॉ़तरणजित कौर यांचे आजोबा इंदरजित सिबल यांनी नाशिकमध्ये खरेदी केलेल्या मालमत्तेवर त्यांच्या मृत्यूनंतर मनजित कौर (आई), जितेंदरसिंग सिबल (मामा) व आजी अमजित कौर सिबल यांची नावे लागली़ २००८ मध्ये डॉ़तरणजित कौर यांनी आईला आपल्या मालमत्तेच्या हिश्श्याबाबत विचारले असता तो ठेवला असल्याचे सांगितले़ मात्र विश्वास न पटल्याने त्यांनी माहिती अधिकारात कागदपत्रे मिळविली त्यावर आपले नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तहसिलदारांकडे मालमत्तेवर नाव लावण्यासाठी अर्ज केला़ १० जानेवारीला शहरातील १२ मालमत्तांवर त्याचे नाव लावण्यात आले होते़ यानंतर आई-वडील राहत असलेल्या घराच्या सातबाºयावर नाव लावण्यासाठी अर्ज केला असून त्यावर तहसिलदारांनी आदेशही दिला आहे़