ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार करून, दोन वेळा गर्भवती राहिलेल्या तरुणीस लग्नास नकार देणा-या रोशन जयसिंग पवार (२६) याच्याविरोधात, कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यापासून झालेली पहिली मुलगी त्याने तिच्या इच्छेविरुद्ध केरळमध्ये दान दिल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.वागळे इस्टेट येथे राहणारी पीडित तरुणी व सध्या राबोडी येथे राहणारा रोशन हे दोघे एकाच ठिकाणी कामाला होते. याचदरम्यान, त्यांची ओळख झाली. त्यातून त्याने तिला पूर्वी राहत असलेल्या माजीवडा गावातील घरी बोलावले. त्या वेळी त्याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर, लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर तो अत्याचार करीत होता. ती गर्भवती झाल्यानंतर, तिने २०१६ मध्ये एका मुलीला जन्म दिला. त्या मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध त्याने केरळ येथील वकिलास दान दिले. त्यानंतर, तो तिच्यावर अत्याचार करीत असताना, पुन्हा ती गर्भवती राहिल्यावर, त्याने लग्नास टाळाटाळ करीत, तिला स्वत: जिवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी दिली.
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 4:12 AM