लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये यंदा कोणत्याही स्वरूपाची करवाढ न करता मिळकतकरातून गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २५० ते ३०० कोटी रुपयांच्या करवाढीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. प्रशासनाला सध्या सुरू असलेल्या जीआयएस मॅपिंगमुळे शहरातील हजारो मिळकती कराच्या कक्षेत येऊन हे वाढीव उद्दिष्ट सहज पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून शहरामध्ये अत्यंत कासवगतीने जीआयएस मॅपिंगचे काम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे शहरामध्ये सुमारे ८ लाख २० हजार मिळकतींची अधिकृत नोंद आहे. परंतु, यापैकी तब्बल अडीच ते तीन लाख मिळकती करच भरत नसल्याचे समोर आले. यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व मिळकतींचे जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला. यामुळे करआकारणी न झालेल्या मिळकती, मिळकत वापरातील बदल, वाढीव बांधकाम या सर्वांची माहिती मिळणार आहे. यासाठी प्रशासनाने सार आय.टी. रिसोर्स कंपनी, मुंबई आणि सायबर सिस्टिम अॅन्ड सॉफ्टवेअर कंपनी ठाणे या दोन खासगी एजन्सींना तब्बल तीस कोटी रुपये देऊन हे जीआयएस मॅपिंगचे काम सुरू आहे. या कंपन्यांनी २० सप्टेंबर २०१६ ते मे २०१७ अखेर पर्यंत केवळ १ लाख ९० हजार मिळकतीचे जीआयएस मॅपिंगचे काम पूर्ण केले. यामध्ये मिळकतकर आकारणी न झालेल्या खूपच कमी मिळकती समोर आल्या आहेत. शहरातील संपूर्ण मिळकतीचे जीआयएस मॅपिंग झाल्यानंतर एकूण उत्पन्नामध्ये तब्बल एक हजार कोटी रुपयांची भर पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता.घरोघरी पाहणी : दोन हजारावर कर्मचारीमॅपिंगसाठी खासगी एजन्सीच्या लोकांसोबत महापालिकेनेदेखील तब्बल दोन हजारपेक्षा अधिक कर्मचारी नियुक्त केले आहेत. महापालिकेचे हे कर्मचारी घरोघरी जाऊन पाहणी करत आहेत. परंतु सध्या एजन्सी आणि महापालिका कर्मचारी यांच्यामध्ये कोणताही समन्वय नाही. त्यामुळे गेल्या नऊ महिन्यांत केवळ १ लाख ९० हजार मिळकतीचे मॅपिंग करणारी एजन्सी आठ लाख मिळकतीचे जीआयएस मॅपिंग कधी पूर्ण करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.सहा महिन्यांत जीआयएसचे काम पूर्ण करणारमहापालिकेकडे नोंद असलेल्या मिळकतींपेक्षा अधिक मिळकती शहरामध्ये असल्याचा अंदाज आहे. ज्या मिळकती महापालिकेच्या नजरेतून सुटल्या आहेत, अशा सर्व मिळकती कराच्या कक्षेत आणण्यासाठी शहरामध्ये सर्व मिळकतीचे जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत १ लाख ९० हजार मिळकतींचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित करण्यात येत असून, पुढील सहा महिन्यांत हे काम पूर्ण होईल.- सुहास मापारी, उपायुक्त, करआकारणी व करसंकलनशहरातील मिळकतींची माहितीनिवासी मिळकती : ६ लाख ६० हजारव्यावसायिक मिळकती : १ लाख २० हजारइतर, मित्र मिळकती : ४० हजार एकूण मिळकती : ८ लाख २० हजार जीआयएस मॅपिंग पूर्ण : १ लाख ९० हजार
मिळकतीचे जीआयएस मॅपिंग कासवगतीने
By admin | Published: May 29, 2017 3:29 AM