राज्याच्या अधिकारातील सवलती मराठा समाजाला तातडीने द्या, काँग्रेसच्या शिष्टमंडळाचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 08:53 PM2021-05-11T20:53:11+5:302021-05-11T20:57:17+5:30

ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात तातडीने पावले उचलावीत. पदोन्नतीतील मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर बैठक घेऊन रणनिती ठरवावी, निवेदनाद्वारे मागणी.

Give the concessions in the power of the state to the Maratha community immediately the statement of the Congress delegation Chief Minister | राज्याच्या अधिकारातील सवलती मराठा समाजाला तातडीने द्या, काँग्रेसच्या शिष्टमंडळाचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

राज्याच्या अधिकारातील सवलती मराठा समाजाला तातडीने द्या, काँग्रेसच्या शिष्टमंडळाचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

googlenewsNext
ठळक मुद्देओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात तातडीने पावले उचलण्याची विनंतीपदोन्नतीतील मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर बैठक घेऊन रणनिती ठरवावी, निवेदनाद्वारे मागणी.

'मराठा समाजाला राज्य सरकारच्या अधिकारात असलेल्या बाबी तातडीने लागू करणे, ओबीसी समाजाने जातनिहाय जनगणनेची केलेली मागणी, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पदोन्नतीतील मागासवर्गींयाचे रद्द केलेले आरक्षण यासंदर्भात योग्य ती पावले उचलून या समाज घटकांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने न्याय द्यावा,' अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.

'मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात घटनात्मक कसोटीवर टिकू शकले नाही. तसेच दुर्दैवाने ते रद्द करुन मागास आयोगाच्या शिफारशीसुद्धा फेटाळून लावल्याचा मराठा समाजावर दूरगामी परिणाम होऊ शकतो. मराठा आरक्षण कायदेशीररित्या टिकले पाहिजे हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात निकालानंतर निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु पुढील निर्णय होईपर्यंत राज्य सरकारच्या अधिकारातील बाबीसंदर्भात तातडीने निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा,' असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. 

एसईबीसी उमेदवारांचे नियुक्तीपत्र द्यावे

२०१४ ते २०२० पर्यंतच्या विविध विभागातील पात्र ठरलेल्या एसईबीसी उमेदवारांचे नियुक्तीपत्र द्यावे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन अर्जदारांना थेट कर्जयोजना सुरु कराव्यात. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंळाला वाढीव एक हजार कोटींचा निधी द्यावा. सारथी संस्थेची स्वायतत्ता पर्ववत प्रदान करुन वाढीव निधी द्यावा. मराठा आरक्षणाच्या चळवळीत निरपराध मराठा तरुणांवर ३०७ व ३५३ च्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून सत्य परिस्थिती लक्षात घेऊन बाकी असलेले ४३ गुन्हे विनाअट तातडीने परत घ्यावेत. मराठा समाजातील २०० विद्यार्थी व २०० विद्यार्थींनासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह सुरु करावे. समांतर आरक्षण भरती प्रक्रिया संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा. मराठा आरक्षण आंदोलनातील शहिदांच्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय सेवेत समाविष्ट करुन त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारकाचे काम पूर्ण करावे. तसेच कोपर्डी प्रकरणातील भगिनीला अंतिम न्याय मिळण्यासाठी उच्च न्यायालयात विशेष सरकारी वकील नेमून तो खटला तातडीने चालवावा, असंही निवेदनात नमूद केलं आहे.

आरक्षण देण्यास कटिबद्ध

देवेंद्र फडणवीस सरकारने विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संविधानिक आणि घटनात्मक बाबी बाजूला सारत आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. परंतु ते आरक्षण घटनात्मक कसोटीवर न्यायालयात टिकू शकले नाही. मराठा समाजाला कायदेशीरदृष्ट्या टिकेल असेच आरक्षण मिळावे हीच काँग्रेसची भूमिका राहिली आहे आणि महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कट्टीबद्ध आहे असेही या निवेदनात म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण राज्य सरकारने रद्द केले आहे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मागासर्गीय समाजाचे मंत्री व प्रतिनिधी यांची बैठक बोलावून त्यांच्याशी चर्चा करावी तसेच पुढील पावले उचलावीत. तसेच केंद्र सरकार ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करणार नसेल तर ती महाराष्ट्र सरकारने करावी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह इतर स्पर्धात्मक परीक्षा घ्याव्यात यासह ओबीसी समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांना न्याय द्यावा. राज्य शासनाच्या सर्व विभागातील अ, ब, श्रेणीप्रमाणेच क आणि ड श्रेणीची पदभरतीसुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच करावी, खाजगी कंपनीकडून पदभरती करू नये, अशा मागण्या काँग्रेस शिष्टमंडळाने केल्या आहेत.
 

Web Title: Give the concessions in the power of the state to the Maratha community immediately the statement of the Congress delegation Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.