मुंबईत माझे घर असले असते तर मलाही नोटीसा आल्या असत्या. बरं झालं नाहीय, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. आता राऊतांनी काहीसे तसेच वक्तव्य केले आहे. राज्यसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर संजय राऊत यांनी भाजपा आणि फडणवीसावर टीका केली आहे.
राऊत यांनी याआधी अपक्ष आमदारांची नावे घेत त्यांच्यामुळे पराभव झाल्याचे म्हटले होते. यावरून आता राजकारण तापू लागले आहे. भाजपाने राऊतांवर आचारसंहिता भंगाचा आरोप केला आहे. राऊतांनी राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप केला. तसेच अपक्ष आमदार विकले गेल्याचा आरोप केला होता.
आज पुन्हा राऊतांनी भाजपाच्या कार्यशैलीवर गंभीर आरोप केले आहेत. यंत्रणा आमच्याकडेही आहेत, फक्त ईडी नाही. जर ईडी ४८ तास आमच्याकडे दिली, तर भाजपसुद्धा शिवसेनेला मतदान करेल, असेही राऊत यांनी म्हटले. महाराष्ट्रात सुद्धा निवडणूक आयोगाला हाताशी धरुन रात्रीच्या अंधारात नेते काय करत होते, हे सगळं आम्हाला माहित आहे, असे म्हणत राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याचबरोबर जर आमच्या हातात २ दिवस ईडी दिली, तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील, असे वक्तव्य केले आहे.
संजय राऊत अडचणीत? सहा आमदारांची नावे फोडणे हा आचारसंहितेचा भंग; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोपशिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस किंवा अन्य पक्षाच्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आला होता. ते अधिकृत पक्षाचे आमदार असल्याने राज्यसभेला मतदान करताना पक्षाच्या प्रतोदाला मताची चिठ्ठी दाखवून ते द्यावे लागते. परंतू अपक्षांना कोणीही विचारू शकत नाही. त्यांनी कोणाला मतदान केले हे कोणीही सांगू शकत नाही. असे असताना अपक्ष आमदारांनी कोणाला मत दिले हे संजय राऊत कसे सांगू शकतात. त्यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.