शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

Ruta Jitendra Awhad: चार दिवस तुमच्या मुलाला शिळे आणि मुलीला ताजे अन्न देऊन बघा..!: ऋता आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 9:43 AM

महिला दिन असा एका दिवशी साजरा करून उपयोग नाही. तुमच्या मुलांमध्ये महिलांविषयी सन्मान स्वतःहून रुजणे आवश्यक आहे

महिला दिन असा एका दिवशी साजरा करून उपयोग नाही. तुमच्या मुलांमध्ये महिलांविषयी सन्मान स्वतःहून रुजणे आवश्यक आहे, तो शिकवता येणार नाही. जर तुम्हाला दोन मुले असतील त्यातील मुलाला शिळे अन्न द्या आणि मुलीला ताजे अन्न द्या. पण बुरसटलेल्या मानसिकतेमुळे आपण असे करण्याची हिंमत दाखवणार नाही. पण ही मानसिकता मोडत आपण असे केल्यास खऱ्या अर्थाने महिलांना समान दर्जा मिळेल आणि तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता येईल. संस्कार म्हणजे ‘शुभं करोति’ शिकवणे किंवा प्रार्थना शिकविणे होत नाही. तर आपल्या मुलांना समाजात जगताना, वावरताना महिलांबाबत आदर बाळगण्याचे आणि त्यांना समान वागणूक देण्याचे गुण रुजवणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला महिला दिन साजरा करावा लागणार नाही.

अनेकदा त्या महिला आहेत म्हणून महिलांचे प्रश्न दुर्लक्षित केले जातात. अशावेळी त्यांनी करायचे तरी काय..? दहा पैकी सात वेळा अनेकदा खोट्या तक्रारी ही समोर येतात. हे मान्य असले तरी तक्रारींची दखल घेतली गेलीच पाहिजे. अनेक महिला तक्रार करायला जातात, मात्र त्याची दखल घेतली जात नाही. हे कुठेतरी थांबले पाहिजे, अशी भावना ही ऋता आव्हाड यांनी व्यक्त केली.

मुली, महिला पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला जातात. त्यावेळी तिथे काम करणारे कर्मचारी आणि त्यांची मानसिकता यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. मध्यंतरी एक मुलगी पोलिस ठाण्यात गेली. तिच्या वडिलांनीच तिच्यावर अत्याचार केले होते. तिने ही गोष्ट पोलिसांना सांगितली. त्यावेळी त्यांनी घरी जा, काही होत नाही असे म्हणून तिला परत पाठवून दिले होते. दुसऱ्या दिवशी त्याच पोलिस ठाण्यातील महिला कर्मचारी आल्यानंतर तिला हा प्रकार समजला. तिने चौकशी केली, आणि खरी घटना समोर आली. आज तो बाप तुरुंगात आहे. मात्र जाणीव ठेवून काम करणारा पोलीस वर्ग असेल तर अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होऊ शकते, असेही त्या म्हणाल्या.

येऊ घालणाऱ्या महिला धोरणाविषयी काय वाटते? काय अपेक्षा आहेत? - महिला धोरण येत असले तरी त्याचा उपयोग तोपर्यंत होणार का जोपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही. मग ते केवळ कागदावर उतरवून उपयोग काय? जर धोरण बनवणारे पुरुषच असतील अशा धोरणाचा उपयोग आणि अमलबजावणी कशी होणार, हा मोठा प्रश्न आहे. महिलांसाठी महिलांनी पुढे येऊन हक्क आणि अधिकारासाठी लढण्याची गरज आहे. अनेकदा महिलांचे प्रश्नच त्या महिला आहेत म्हणून दुर्लक्षित केले जातात, मग अशा वेळी त्यांनी काय करायचे? १० मधील ७ वेळा अनेकदा खोट्या तक्रारीही समोर येतात हे मान्य असले तरी त्याची दखल घेतली जाणे प्राथमिक आवश्यकता आहे. पोलीस प्रशिक्षणावेळी पुरुष आणि महिला एकत्रित प्रशिक्षण घेत असले तरी महिलांवरील प्रश्नांना केवळ १० गुण असतात, महिला सबलीकरण आणि धोरण कुठे असते? कागदावर केवळ उपाययोजना केल्या म्हणजे महिला धोरण होणार नाही, तर त्यासाठी प्रत्यक्षात प्रयत्न होतील आणि त्यातील गोष्टी घडतील तेव्हा अशा महिला धोरणाची गरजच लागणार नाही. 

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिन