शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

एफआरपी द्या, अन्यथा परवाने रद्द!

By admin | Published: December 23, 2015 2:23 AM

केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या एफआरपीनुसार साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना रक्कम देणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी १३० कारखान्यांनी एफआरपी दिली.

नागपूर/सोलापूर : केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या एफआरपीनुसार साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना रक्कम देणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी १३० कारखान्यांनी एफआरपी दिली. ज्यांनी अद्याप एफआरपी दिली नाही, अशा ५१ साखर कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांनी दोन दिवसात एफआरपी दिली नाही तर त्यांचे परवाने रद्द केले जातील, असे आश्वासन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.एफआरपी देण्याबाबत ८०: २० चा फार्म्युला निश्चित करण्यात आला असला तरी साखरेचे भाव पडल्यामुळे साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत, याकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. पवार म्हणाले, भाव पडत असल्यामुळे व्यापारी अडचणीतील साखर कारखान्यांना पैसे देऊन साखरेचा साठा करीत आहेत. भविष्यात तूर दाळीसारखा साखरेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एफआरपीबाबत सरकार फेरविचार करेल का, असा प्रश्न त्यांनी केला. यावर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्र सरकारच्या नियमानुसार शेतकऱ्याने ऊस देताच त्याला १५ दिवसात १०० टक्के एफआरपी देणे बंधनकारक आहे. मात्र, कोसळणाऱ्या दरांची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन शेतकरी संघटनांशी चर्चा केली. संघटनांनी पहिल्या टप्प्यात ८० टक्के एफआरपी घेणे मान्य केले. राज्य सहकारी बँकेनेही मूल्यांकन वाढविले. खरेदी कर माफ करण्यात आला. एवढे करूनही एफआरपी दिली जात नसेल तर कारवाईशिवाय पर्याय राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब थोरात यांनी एफआरपीचा फार्म्युला बदलण्याची मागणी केली. यावर पाटील यांनी एफआरपी केंद्र सरकार निश्चित करीत असल्याचे सांगत एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्ली येथे पंतप्रधानांच्या भेटीसाठी नेले जाईल व त्यांच्याकडे तशी मागणी केली जाईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले. > या कारखान्यांना नोटीसनलावडे शुगर, महाडिक शुगर अ‍ॅग्रो (कोल्हापूर), महाकाली, माणगंगा, वसंतदादा, यशवंत खानापूर, सद्गुरु श्री.श्री. शुगर रोवाडी(सांगली), लो.भा. देसाई, रयत, प्रतापगड, न्यू फलटण (सातारा), भीमा पाटस, कर्मयोगी इंदापूर, नीरा-भीमा, राजगड, संत तुकाराम (पुणे), आदिनाथ, सिद्धेश्वर, शंकर सहकारी, सहकार महर्षी, मकाई करमाळा, कूर्मदास, लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे, लोकनेते बाबुराव पाटील शुगर, इंद्रेश्वर शुगर, विजय शुगर करकंब, सीताराम महाराज खर्डी, शेतकरी चांदापुरी, शंकररत्न आलेगाव ( सोलापूर), अगस्ती, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरानगर, संगमनेर भाग (सहकार महर्षी बी. थोरात), वृद्धेश्वर, प्रसाद शुगर (अहमदनगर), कांदवा, गिरणा, आर्मस्ट्राँग, मधुकर सहकारी (नाशिक), समृद्धी शुगर(जालना), वैद्यनाथ(बीड), महाराष्ट्र शेतकरी शुगर (परभणी), भाऊराव चव्हाण डोगरकडा-२, पूर्णा, बाराशिव हनुमान पूर्णा-२ (हिंगोली), भाऊराव चव्हाण युनिट १,भाऊराव चव्हाण युनिट ४ ( एच.जे.पाटील) (नांदेड), डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठलसाई मुरुम, शिवशक्ती वाशी, लोकमंगल माऊली(लोहारा) (उस्मानाबाद) आणि सिद्धी शुगर(लातूर)