नागपूर : जागतिक कीर्तीच्या दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा मिळावा, अशी एकमुखी मागणी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी सोमवारी केली. तसा प्रस्ताव संमत करण्यात आला. हा प्रस्ताव आपण मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत सादर करू, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.दीक्षाभूमीला राज्य शासनातर्फे नुकताच पर्यटनाचा ‘ब’ श्रेणीचा दर्जा घोषित करण्यात आला. दीक्षाभूमीचे महत्त्व लक्षात घेता हा निर्णय एकूणच अन्यायकारक असाच होता. सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या विषयावर जोरदार चर्चा झाली. सदस्यांनी अतिशय आक्रमकपणे हा विषय लावून धरला.
दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचाच दर्जा द्या
By admin | Published: September 01, 2015 1:11 AM