शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

उद्योगाला द्या नावीन्यपूर्ण आकार

By admin | Published: July 02, 2017 1:27 AM

मूल जन्माला आल्यापासून, ज्या छोट्या छोट्या सवयींमधून त्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात त्या छोट्या छोट्या सवयींमधून मुलाच्या जीवनाला

- डॉ. शिवांगी झरकर  मूल जन्माला आल्यापासून, ज्या छोट्या छोट्या सवयींमधून त्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात त्या छोट्या छोट्या सवयींमधून मुलाच्या जीवनाला व मनाला एक दिशा मिळते आणि त्याची फलश्रुती म्हणून मिळते त्याला एक व्यक्तिमत्त्व. जे त्याला घडवते, बनवते आणि पुढे नेते. त्याच्या बळावर ते मूल मोठे होऊन प्रगती करते, परंतु कितीही बदल आपल्या जीवनात आपण केले, तरीही बालपणीच्या त्या सवयी कधीही कोणीच मिटवू शकत नाही. असेच काहीस नाते असते उद्योगाचे, आपले आणि उद्योग संस्काराचे. आपल्याला जे जे अनुभव उद्योग क्षेत्रात येतात, जे आपण प्रत्येक क्षणी शिकतो त्याने आपले व्यावसायिक, सामाजिक आणि आर्थिक चित्र सुस्पष्ट होते, त्यांना उराशी बाळगत निर्माण होते एक उद्योग प्रतिबिंब. हे प्रतिबिंब जर तुम्हाला स्वच्छ, निर्मळ आणि तेजस्वी ठेवायचे असेल तर दररोज द्यावे लागतात ‘उद्योग संस्कार’. म्हमूनच शिक्षणाबरोबर भविष्यात त्याला उद्योगाच्या या संस्काराची फार आवश्यकता आहे. कारण काही लोक नोकरी करणारे असतील तर काही उद्योग. उद्योगाला धंदा आणि व्यवसाय असेही म्हणतात. परंतु धंदा आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी थोड्याफार प्रमाणात उद्योगाहून भिन्न आहेत. धंदा म्हणजे धनदा (धन देणारा किंवा धन आणणारा) त्याचप्रमाणे व्यवसाय म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला दिशा देणारा. या सर्व गोष्टींहून थोड्या प्रमाणात भिन्न म्हणजे उद्योग. स्वत:ला स्वत:शी ओळख करवून देणारा तो म्हणजे उद्योग; आणि याच उद्योगाची दोन मुळे, ती म्हणजे धंदा आणि व्यवसाय. आणि उद्योजकाला लागतात उद्योग संस्कार! ते केल्यावरच तो योग्य मार्गावर मार्गक्रमण करण्यास सक्षम होतो. उद्योग संस्कार कोणकोणते असतात?उद्योग आकलन : उद्योग आकलन म्हणजे उद्योगाची तुम्हाला आणि तुमची उद्योगाला ओळख. त्याच सोबत एकमेकांबरोबरची सवय... उद्योग निवड करण्याआधी तुम्हाला उद्योग या शब्दाचा अर्थ माहीत असणे आवश्यक आहे. उद्योग निवडला म्हणजे उद्योग समजला किंवा उद्योगाची संपूर्ण माहिती झाली असे होत नाही. त्यासाठी आपण उद्योगाबद्दलचे आकलन करणे आवश्यक आहे. उद्योगाच्या आकलनामध्ये उद्योगांचे नियम, उद्योग सूत्रे, उद्योगचे बारकावे, नीती आणि उद्योगाची खोली माहिती असणे आवश्यक आहे. उद्योगाचे तुमच्या सोबत अतुट नाते निर्माण होणे आवश्यक आहे. म्हणजे वेगवेगळ्या उद्योगांच्या प्रगतीचे, शेअरचे, प्रकारांचे, बारकाव्यांचे अवलोकन करणे आवश्यक आहे. त्यासाठीआजपासून ‘उद्योग शिक्षण’ घेणे आवश्यक आहे.उद्योग निवड :जशी आवड तशीच निवड असते... जर उद्योग निवडायचा असेल तर खालील बाबींवर नजर टाकणे आवश्यक आहे.च्तुमच्या आवडीच्तुमच्या सवयीच्तुमचा स्वभावच्सामर्थ्य आणि त्रुटीच्तुमचे गुण आणि दोषच्तुमचा वेग (लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचे अंतर / वेळ)च्तुमचे कौशल्य आणि दृष्टीकोन यांचा समतोलच्तुमची विचारसरणी च्तुमची सर्जनशीलता आणि चाकोरीबाहेरची विचारसरणीच्तुमचे ध्येय, धारणा आणि लक्ष्यभेदच्तुमचे नियोजन आणि योजनातुम्हाला मिळणाऱ्या संधी आणि वाटेत असलेली संकटे या सर्व गोष्टी तपासून मग उद्योग निवडा.उद्योग संस्कार आत्मसात करण्यासाठी आपण स्वत: उद्योगासाठी लागणारी मानसिकता समजून घेतली पाहिजे. आत्मसात केली पाहिजे. ती मानसिकता कोणती हे आपण समजून घेऊ.धडाडी दाखवा - जर उद्योगात यशस्वी व्हायचे असेल, तर धडाडी दाखवणे गरजेचे आहे. कारण उद्योगात कोणत्याही कमकुवतपणाला स्थान नसते. त्यामुळे जेवढी मोठी जोखीम तेवढे यश मिळते.दृष्टीकोन म्हणजे सर्वस्व - उद्योगात, दृष्टीकोन म्हणजे सर्वस्व आहे. त्यामुळे नकारात्मक दृष्टीकोन सोडा आणि सकारात्मक विचार करा. स्वत:वर विश्वास करायला शिका. स्वत:ला जिंकले तर उद्योगाच्या माध्यमातून जगाला जिंकाल.योग्य निवड करा - निवड हा एक शब्द तुम्हाला सर्वोच्च शिखरावर घेऊन जाऊ शकतो किंवा रसातळाला नेऊ शकतो. म्हणून निवड ही योग्य हवी. निवड... उद्योगाची, उद्योगाबाबतच्या परिस्थितीची, औद्योगिक मित्र-मैत्रिणींची, योग्य निर्णय घेण्याची हवी. तर जर असेल तर तुमचे करिअर, उद्योग आणि जीवन सुरळीत सुरू राहते.स्वत:च्या ध्येयांचा न बोलता स्वीकार करा - जसे निवड महत्त्वाची असते... अगदी त्याचप्रमाणे स्वत:च्या उद्दिष्टांचा, ध्येयांचा, सीमांचा शोध घेऊन त्यांचा स्वीकार करणेही महत्त्वाचे आहे. म्हणून आजपासून स्वत:चा स्वीकार करायला सुरू करा. त्यातून तुम्हाला नक्कीच यश मिळेल.उद्देशपूर्व दृष्टी - जर तुमच्या दृष्टीला योग्य असे उद्देश असतील तर तुम्ही त्वरित यशस्वी होऊ शकता. उद्देश नेहमी स्वार्थावर नसावा. तो नेहमी स्वत:ला अर्थ देणारा असावा.आव्हाने स्वीकारा - आव्हाने तुम्हाला तुमच्या यशाच्या आणि यशस्वी पायऱ्या मोजायला मदत करतात. म्हणून आव्हाने स्वीकारा, त्यामुळे एक-एक पडाव पार करताना तुमचे उद्योग संस्कार एकदम पक्के होतात आणि तुम्ही वेगाने पुढे जातात.जाणीव करून घ्या आणि द्या - जाणीव या शब्दातून तुम्हाला प्रत्येक पायरी जपायला, वाढवायला मदत होते. त्यामुळे तुमचा औद्योगिक आयक्यू वाढायला मदत होते. त्यामुळे भावनात्मक होण्यापेक्षा तुम्ही सर्व निर्णय संवेदना आणि करुणेच्या जिवावर घ्यायला सुरू होता यासाठी जाणीव करून घ्या आणि द्या.आवड जपा - जे जे तुम्हाला आवडते ते ते सर्व जपण्याचा आराखडा बनवा. त्यामुळे तुमच्या सर्व आवडींना एक योग्य दिशा मिळेल.कृतज्ञता बाळगा - जेवढी जास्त तुम्ही कृतज्ञता दाखवाल, तेवढे जास्त तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल.कृती करा - उद्योगाबद्दल एवढे ऐकल्यानंतर त्याला कृतीत उतरवण्याची वेळ आली आहे; म्हणून परिणामाची चिंता न करता, कृती करा आणि अनुभव मिळवा.वरील १० मानसिकता उद्योगात अवलंबल्या तर तुमचा उद्योग एका ठरावीक उच्चांकाला येऊन पोहोचेल. म्हणून उद्योग संस्कार महत्त्वाचे आहेत, त्यामुळे उद्योगात वेगाने प्रगती होते आणि आपण एक विशिष्ट शिखरावर पोहोचतो. म्हणून उद्योगाला जिवंत करा. जिवंत ठेवा आणि यशाचे सर्वोच्च शिखर गाठा. उद्योगाची गाडी या उद्योग संस्काराच्या जिवावर वेगाने धावली पाहिजे. म्हणूनच उद्योग संस्काराचा बूस्टर डोस उद्योगाला देऊन उद्योग सशक्त करा!