शहरं
Join us  
Trending Stories
1
३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो
2
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
3
कार्यकर्त्यांना वाटतं फडणवीस यांनीच CM व्हावं, पण...; मुख्यमंत्रीपदासंदर्भात बावनकुळेंचं सूचक विधान
4
'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार?
5
शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत
6
महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली
7
Reliance JIO-BP चा पेट्रोल पंप डीलर बनण्याची संधी, जाणून घ्या काय काय करावं लागेल?
8
राज्यातील २३ मतदारसंघ... ज्यांच्यावर २३ नोव्हेंबरला असेल अख्ख्या महाराष्ट्राची नजर; उलथापालथ होणार?
9
‘लोकल’ बंद न ठेवता ‘त्यांनी’ केले मतदान;  रेल्वे प्रशासनाची प्रशंसनीय व्यवस्था
10
४ ग्रहांचे गोचर: ७ राशींना डिसेंबर करेल मालामाल, अनेक लाभ; उत्तम नफा, पद-पैसा-ऐश्वर्य काळ!
11
IAS ची पत्नी असल्याचं खोटं सांगून कोट्यवधींची फसवणूक; किटी पार्टीच्या नावाखाली महिलांना गंडा
12
बायोडिझेल तयार करणाऱ्या कंपनीचा येणार IPO; आतापासूनच GMP मध्ये तुफान तेजी
13
भारीच! 'या' २५ मतदारसंघांमध्ये झालं ७५ टक्क्यांहून अधिक मतदान; ८४.७९ टक्केवाला 'टॉपर'
14
"सगळं ओक्केमध्ये असेल तर..." कॅप्टन बुमराहचं सहकारी शमीसंदर्भात मोठं वक्तव्य
15
पश्चिम रेल्वेवर नवी एसी लोकल दाखल;आठवडाभर टेस्टिंग; प्रवाशांना दिलासा
16
निकालानंतरच्या रणनीतीसाठी मविआ नेत्यांची आज बैठक; अपक्षांसोबत संपर्क साधणार
17
एकनाथ शिंदे ते पृथ्वीराज चव्हाण: प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघात किती झाले मतदान?
18
अमेरिकेतील लाच प्रकरणी Adani Group कडून पहिली प्रतिक्रिया; अदानींवरील आरोपांवर दिलं 'हे' उत्तर
19
रुग्णाबाबत महिला न्यायाधीशांनी वाचली बातमी अन् थेट पोहोचल्या हॉस्पिटलमध्ये..., आता होतंय खूप कौतुक!
20
"लोकांना सरकारबद्दल आपुलकी आहे म्हणूनच..."; मतदानाची टक्केवारी वाढल्यावर फडणवीसांचे विधान

प्रत्येक शासकीय कार्यालयात मिळणार आता इंटर्नशीपची संधी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 8:04 PM

Chief Minister Eknath Shinde : प्रशिक्षणार्थी म्हणून उमेदवाराला त्यांचे कौशल्य विकसित करण्याची आणि पुढे जाऊन, त्याला त्याच्या पात्रतेची आणखी चांगली नोकरी, व्यवसाय, उद्योग यांची निवड करता येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबई : राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशीप-प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून संधी उपलब्ध करून द्या. मंजूर पदाच्या कमीत कमी पाच टक्के आणि किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल यासाठी नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले. तसंच, लाडका भाऊ म्हणून या योजनेला पसंती मिळाली आहे. यात पात्र बहिणींना संधी मिळणार आहे, म्हणून उद्योग, कौशल्य विकास यांच्यासह सहकार, उच्च व तंत्रशिक्षण, सहकार, बंदर विकास, परिवहन यांच्यासह सर्वच विभाग आणि यंत्रणांनी समन्वयाने योजनेची अंमलबजावणी करावी असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, युवक कल्याण व क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, केंद्रीय अर्थसंकल्पातही आपल्या योजनेचे प्रतिबिंब उमटल्याचे दिसते. त्यामुळे ही उद्योगांनाही  कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी ही मोठी संधी आहे. उमेदवाराला अनुभव चांगला अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. प्रशिक्षणार्थी म्हणून उमेदवाराला त्यांचे कौशल्य विकसित करण्याची आणि पुढे जाऊन, त्याला त्याच्या पात्रतेची आणखी चांगली नोकरी, व्यवसाय, उद्योग यांची निवड करता येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्याची ही फ्लॅगशीप योजना आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी योजना राबवत आहोत. युवक-युवतींना मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणाची संधी मिळाल्यास, ही योजना सफल होणार आहे. त्यासाठी सर्वच विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावे लागतील. उमेदवारांची मोठ्या संख्येने नोंदणी व्हावी यासाठी सुलभ यंत्रणा उभी केली पाहिजे. लाभार्थी उमेदवार तसेच उद्योगांनीही नोंदणीसाठी पुढे यावे यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी चांगले नियोजन केले जावे, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

सरकारी कार्यालयात इंटर्नशीपची संधीराज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय ते पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्यासह महानगरपालिका, नगरपालिका विविध शासकीय कार्यालयांत उमेदवारांना त्यांच्या पात्रतेसह प्रशिक्षणार्थी म्हणून संधी दिली जावी यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, संबधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समन्वय राखून प्रयत्न करावेत. या उमेदवारांना आपण शैक्षणिक पात्रतेनुसार सहा हजार रुपये, आठ हजार रुपये आणि दहा हजार रुपये असे विद्यावेतन देणार आहोत. त्यामुळे उद्योगांसह, सहकारी बँका, कृषी सहकारी पतसंस्था याठिकाणी मोठ्या संख्येने प्रशिणार्थींना संधी मिळणार आहे, त्यासाठी अशा रिक्त पदांची यादी करून, त्या-त्या जिल्ह्यांमध्ये प्रशिणार्थींना लगेच संधी उपलब्ध करून देता येणार आहे. यासाठी ऑनलाईन तसेच ऑफ लाईन या दोन्ही पद्धतींने नोंदणी करण्यात यावी. जिल्हा रोजगार कार्यालये, जिल्हा उद्योग केंद्र आदींनी विशेष बाब म्हणून प्रयत्न करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन